जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा खातेदारांनी लाभ घ्यावा - संचालक ज्ञानदेव रांजणे

0

 

केळघर - जनाबाई भणगे यांना धनादेश देताना ज्ञानदेव रांजणे , मोहनराव कासुर्डे , सूर्यकांत चिकणे, जगनाथ शेलार , प्रदीप कासुर्डे , तेजस कासुर्डे , अक्षय पवार , संतोष शिर्के आदि


जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा खातेदारांनी लाभ घ्यावा - संचालक ज्ञानदेव रांजणे


जिल्हा बँकेच्या केळघर येथील शाखेच्यावतीने मयत खातेदाराला विमा धनादेश वितरण


केळघर : प्रतिनिधी-( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -  जिल्हा बँकेच्यावतीने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून सर्वसामान्य कष्टकरी ,शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा बँक सदैव तत्पर आहे . असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले .

      केळघर येथील जिल्हा बँकेच्यावतीने , खातेदार कै धोंडीराम गणपत भणगे रा वाटंबे ( ता जावली ) यांचे आकस्मित निधन झाले होते . त्यावेळी बँकेने पुढाकार घेत त्यांचा प्रिमियम भरला होता . त्या विम्याचा दोन लाख रुपयेचा धनादेश त्यांच्या आई जनाबाई गणपत भणगे यांना देण्यात आला . यावेळी श्री रांजणे बोलत होते . यावेळी  शाखा प्रमुख सूर्यकांत चिकणे, मोहनराव कासुर्डे, जगन्नाथ शेलार, सुनिल भणगे, केळघर सोसायटीचे सचिव आनंदा शेलार, वरोशीचे सचिव दिपक शेलार , विश्वास बेलोशे,प्रदीप कासुर्डे, ,तेजस कासुर्डे, अक्षय पवार ,संतोष शिर्के आदिंची प्रमुख उपस्थिती होती .

      यावेळी ज्ञानदेव रांजणे म्हणाले ,जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असून शेतकरी , कष्टकरी यांच्यासह छोट्या मोठ्या उद्योगांसाठी बँक विविध योजना राबवत आहे . याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा . यावेळी आभार सूर्यकांत चिकणे यांनी मानले .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)