शिवसेनेच्या जावली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या उद्या मेढा येथील कार्यालयात मुलाखती
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) - शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभुराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली व सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी ताकदीने सामोरे जायचे असल्याने
जे उमेदवार शिवसेना पक्षाकडून या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत . त्या सर्व इच्छुक उमेदवारांनी उद्या,शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी आपला कार्य अहवाल घेऊन मुलाखतीसाठी ठीक 1.00 वाजता शिवसेना कार्यालय शिवकृष्ण हाईट्स, ओंबळे इलेक्ट्रॉनिक्सच्या वर मेढा येथे उपस्थित रहावे . असे आवाहन शिवसेनेचे निवडणुक प्रभारी व सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी केले आहे .
दरम्यान पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी एकनाथ ओंबळे यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या खांद्यावर तालुक्यातील निवडणुक प्रभारी म्हणून नव्याने जबाबदारी दिल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे .

