वागदरे गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेलार यांना आंबेघर तर्फ मेढा गणातून उमेदवारी द्यावी अशी म्हाते पंचक्रोशी ग्रामस्थांची मागणी

0

 


वागदरे गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेलार यांना आंबेघर तर्फ मेढा गणातून उमेदवारी द्यावी अशी म्हाते पंचक्रोशी ग्रामस्थांची मागणी

केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होतात आंबेघर गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वागदरे गावचे सुपुत्र तसेच सरपंच सौ वनिता शेलार यांचे पती श्री राजेंद्र शेलार यांना आंबेघर तर्फ मेढा गणातून भाजपाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी म्हाते पंचक्रोशी ग्रामस्थांसह संपूर्ण गणातून करण्यात येत आहे.

राजू शेलार यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात मुंबईमध्ये महाराजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या श्रीमंत छत्रपती बाबाराजे प्रतिष्ठानमधून झाली आहे. प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून ते आज पर्यंत महाराजसाहेबांच्या सूचनेनुसार आजही त्यांची समाजसेवा चालू आहे.

राजू शेलार हे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे निष्ठावंत म्हणून सर्व परिचित आहेत. गावच्या सर्वांगीण विकासासाठी महाराज साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी आपल्या दोन वर्षाच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात वागदरे गावात अनेक विकास कामे केली आहेत.

एक सुशिक्षित व होतकरू तरुण चेहरा आंबेघर गणाच्या विकासासाठी व बाबाराजेंचे काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राजू शेलार हे एक सक्षम उमेदवार आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पण एकनिष्ठ असलेल्या सर्वसामान्य तरुणाला राजकारणात संधी दिली जाऊ शकते अशी अपेक्षा महाराजसाहेबांकडून आंबेघर गणातील सर्वसामान्य जनतेला आहे.

विभागवारीचा विचार केला तर आज पर्यंत म्हाते पंचक्रोशीच्या आणि गवडी, सावली,मामुर्डी, दिवदेवाडी चोरांबे या गावांना पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून एकदाही प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नसून आता ती संधी श्री राजू शेलार यांच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे देतील असा विश्वास नागरिकांना वाटतो आहे.

राजू शेलार यांना आंबेघर गणातून उमेदवारी द्यावी अशी विनंती नुकतीच म्हाते पंचक्रोशी तसेच आंबेघर गणातील ग्रामस्थ आणि मुंबईकर तरुण मंडळांनी महाराजसाहेबांकडे केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)