महिलांच्या सक्षमीकरणासाठी ताकतीने उभ्या राहणाऱ्या गांजे गावच्या माजी सरपंच सौ. लक्ष्मी चिकणे यांना कुसुंबी पंचायत समिती गणातून संधी मिळावी — कुसुंबी गणातील महिलांची व नागरिकांची मागणी

0

 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ताकतीने उभ्या राहणाऱ्या गांजे गावच्या माजी सरपंच सौ. लक्ष्मी चिकणे यांना कुसुंबी पंचायत समिती गणातून संधी मिळावी — कुसुंबी गणातील महिलांची व नागरिकांची मागणी 


 


कुसुंबी : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - कुंसूंबी गणात सामाजिक, राजकीय आणि बचतगट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी सरपंच सौ. लक्ष्मी चंद्रकांत चिकणे यांना येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती  निवडणुकीत कुसुंबी गणामधून महिला उमेदवार म्हणून संधी द्यावी, अशी मागणी नागरिक आणि कार्यकर्त्यांतून जोर धरू लागली आहे.


मुळच्या घरातघर असलेल्या  लक्ष्मीताई चिकणे यांचे बालपण कष्ट, प्रामाणिकपणा आणि स्वावलंबन या मूल्यांमध्ये गेले. माहेरी टेर्लरीग, TV केबल, फोटो स्टुडिओ आणि शेती व्यवसाय असल्याने त्या स्वतः १२-१२ तास काम करीत. मेहनतीची, आत्मनिर्भरतेची ही सवय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया ठरली.


लग्नानंतर गेली तेरा वर्षे त्या आपल्या पती— श्री. चंद्रकांत चिकणे ( मा.ना. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले ) यांचे कटर कार्यकर्ते यांच्यासोबत सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.


● बचतगट व्यवस्थेत सक्रिय भूमिका


मेढा (जावली) त्या फोटोग्राफी . व्यवसाय करत असून, गांजे गावात २०१८ ते २०२३ या कालावधीत सरपंच लोकनियुक्त महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या होत्या—गावातील सर्व स्थानिक पुढाऱ्या विरुद्ध तेही मतदानाच्या ८०% इतके मतदान घेवून. एक हाती सत्ता घेतली होती.सध्या त्या बचत गटासाठी विविध बँकांच्या सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.


● सामाजिक क्षेत्रातील उपक्रम


सरपंच कालावधी मध्ये लक्ष्मीताईनी गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या नावे ७ दस्त केले त्या जागेत पाणी पिण्यासाठी बोरवेल, अगंणवाड्या, पाणी पुरवठा योजनेच्या टाक्या बांधल्या , स्वमालकीच गावठानातील जागा विना मुल्य ग्रामपंचायतीस बक्षीस दिली आणि तेथे ग्राम पंचायत कार्यालय बांधले शाळा , माध्यमिक विद्यालय , रस्ता डांबरीकरण, संरक्षण भिंती , सार्वजनिक शौचालय आणि अपंग शौचालय बांधले,  सभामंडप, विहीरला आडवी बोर मारून झऱ्याचे पाणी वाढवले,  मोठी पाणी टाकी बांधून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी दिले, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची दुरुस्ती, अतिवृष्टीतून बंधारे दुरुस्ती, ओढ्यावर धोबी घाट , छोट्या मोठ्या वस्तीकडे जाणारे सिमेंटचे रस्ते, सकाळ रिलिफ फंडातून  जुन्या बंधार्‍याचां गाळ काढणे व ओढे खोलीकरण केले त्यामुळे विहीरींच्या पाण्यात वाढ झाली. अशा प्रकारे विविध फंडातुन विविध कामे केली. सरपंच कालावधीत एकही भांडणतंटा , पोलीस स्टेशन पर्यत न जाता गावातील भांडणतंटे तंटामुक्ती मार्फत गावातच मिटवले .


महिलांच्या सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन लक्ष्मीताईंनी १०० हून अधिक विविध बचत गट  स्थापन केले. सरपंच कालावधी मध्ये  बचत गट  माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण,स्वच्छता आणि कुटुंब समुपदेशन अशा विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवले आहेत.सरपंच व बचत गट या महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी हजारो महिलांना एकत्र करून स्वावलंबनाची चळवळ उभारली.

छ . वेदांतिकाराजे भोसले (वहिनी साहेब ) यांच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी टेलरींग मशीन देवून आर्थिक स्वावलंबी बनवले तसेच महीलांसाठी  स्वसंरक्षण वर्ग सुरू केले, तर  शेकडो कुटुंबांमध्ये ऐक्य आणि परस्पर समजूत निर्माण केली.


कोरोना काळात लक्ष्मीताईनी गावातील श्रीमंत , गरीब व घरातील नाती यां सर्वाना समान न्याय दिला. गावातील गरिब आर्थिक परिस्थीती बिकट असणाऱ्याना  रुग्णांना औषधे, जेवण आणि राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली — हा त्यांचा संवेदनशील सेवाभाव जनमानसात कोरला गेला.सरपंच कालावधीत व आताही बचत गटामार्फत  विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्य वाटप, मुलीसाठी सर्वरोगनिदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा तसेच हनुमान जयंती , रथयात्रा, शिवजयंती उत्सव असे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या पार पडतात.


● संघटनात्मक व राजकीय योगदान


लक्ष्मीताई भारतीय जनता पक्षाच्या आघाडीमध्ये कार्यरत आहेत. तसेच बचत गटामार्फत  महिलाना  मोफत व्यावसाय प्रक्षीण सेवा देत आहेत. अनलूम संस्थे मार्फत महिला यांना मार्ग दर्शनाचे काम यशस्वीरीत्या पार पाडत आहेत


     नागरिकांची भावना


 कुसुंबी गणामधील नागरिक म्हणतात,


> “ बचत गटा माध्यमातून लक्ष्मीताईंनी गेली अनेक वर्ष कुसुंबी गणात महिलांसाठी, वृद्धांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काम केले आहे. त्यांच्यात नेतृत्व, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा आहे. त्यामुळे पंचायत समितीत महिलांचे प्रभावी प्रतिनिधित्व त्यांच्यामार्फत होईल.”




लक्ष्मीताईंनीही नागरिकांचा विश्वास जपत सांगितले,


> “मला कुसुंबी गणा मधील जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, हा माझ्यासाठी सन्मान आहे. माझे ध्येय म्हणजे ‘महिलांचे सक्षमीकरण, स्वच्छता, शिक्षण आणि समाजहिताचे कार्य’ — आणि तेच माझे आयुष्यभराचे ध्येय राहील.”


अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण सामाजिक, बचत गट आणि संघटनात्मक कार्याच्या पार्श्वभूमीवर, कुसुंबी गणातून मधून माजी सरपंच गांजे सौ. लक्ष्मी चंद्रकांत चिकणे यांना संधी मिळावी, अशी एकमुखाने मागणी नागरिक, कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटकांकडून केली जात आहे.

त्यांच्या रूपाने जावली पंचायत समितीला महिलांना एक संवेदनशील, कर्तबगार आणि सजग प्रतिनिधी लाभेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)