माझ गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना चांगली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग द्यावा - कविता ओंबळे

0

 


केळघर - मार्गदर्शन करताना कविता ओंबळे , शेजारी एकनाथ ओंबळे , आतिश कदम , जोन्सना पार्टे, डॉ ज्ञानेश्वरी बोराणे , बाळासाहेब शिर्के ,राजेश बेलोशे, प्रशांत जुनघरे , सतीश मर्ढेकर व इतर


माझ गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना चांगली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग द्यावा - कविता ओंबळे


केळघर : प्रतिनिधी - (टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - 

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान चांगले राहण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेले माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना चांगली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग द्यावा .गावातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहण्यासाठी शासनाने हे चळवळ चालू केली आहे रुग्णसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे.असे आवाहन कुसुंबी जि प गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कविताताई ओंबळे यांनी केले .

          केळघर ता . जावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित माझ गाव ,आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या . यावेळी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे , पंचायत समिती सदस्य आतिश कदम , सरपंच जोत्सना पार्टे , केडंबे सरपंच महादेव ओंबळे,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सचिन शेलार , सेना वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रशांत जुनघरे , बाळासाहेब शिर्के , राजेश बेलोशे , तुकाराम साळुंखे , वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वरी बोराणे , विस्ताराधिकारी संदीप शेवते, आरोग्य सहाय्यक अमर शेडगे , प्रमोद भुजबळ , आरोग्य सहाय्यक अंजुम इनामदार , आरोग्य सेवक प्रदीप वाघमळे, शुभम जाधव , प्रकाश भोंडे , आरोग्य सेविका पल्लवी झनकर, विनोद ओंबळे , दत्ता ओंबळे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .

           यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे म्हणाले , राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या संकल्पनेतून माझं गाव ,आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना चालू झाली असून ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याविषयक सुधारणा व्हावी ,लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ही योजना गावागावात प्रभावीपणे राबविण्यासाठी व लोक सहभाग वाढविण्यासाठी या योजनेतर्गत पुरस्कार ठेवण्यात आले आहेत .यावेळी पंचायत समिती सदस्य आतिश कदम म्हणाले , गावागावातील नागरिकांनी माझे गाव ,आरोग्य संपन्न गाव या योजनेत सहभागी होऊन आपल्या गावाचे आरोग्यमान सुधारण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करावेत . प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल .

         यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ ज्ञानेश्वरी बोराणे यांनी सांगितले ,लोकसहभागातून गावात आरोग्य अभियान राबवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून यासाठी पुरस्कार ठेवण्यात आले आहेत . एप्रिल ते मार्च अखेर गावा -गावात विविध उपक्रम आरोग्य विषयक उपक्रम राबवले जाणार असून यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी लोक सहभाग घेऊन हे उपक्रम प्रभावी राबवण्यासाठी सतर्क रहावे असे आवाहन केले . तसेच नागरिकांनी कोणत्याही असंसर्गजन्य आजाराची भिती बाळगू नये .

         यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी वर्ग व आशा सेविका उपस्थित होत्या . आरोग्य सहाय्यक सतीश मर्ढेकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले .


⚫ केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत केळघर , केडंबे , वरोशी , गवडी व भणंग अशी पाच उपकेंद्र असून 34 गावे वाड्या वस्त्यांचा समावेश आहे .

⚫ प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गंत अपुरा कर्मचारी वर्ग

⚫ येथे रुग्णांना आयव्ही सिरिंज बाहेरून विकत आणायला सांगितले जाते .

⚫ येथे केसपेपरचा तुटवडा असून कोऱ्या कागदावर कर्मचारी करतात केसपेपचे काम

⚫ कुसुंबी जि प गटातील बामणोली , कुसुंबी व केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमास तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ संदीप यादव हे गैरहजर होते . त्यामुळे लोकप्रतिनिधीनी व्यक्त केली नाराजी

⚫वरील समस्यांबाबत एकनाथ ओंबळे यांनी भाषण चालू असतानाच, कार्यक्रमातूनच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिफे यांना दूरध्वनी वरून संपर्क साधत वरील समस्यांबाबत माहिती दिली .


 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)