अंमली पदार्थ देशाच्या प्रगतीतील मोठा अडसर आहे त्याला वेळीच दूर केले पाहिजे – न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड

0

 

सावरी - अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध्य तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस व बालकांचे अधिकार या संबंधी कायदेविषयक जनजागृती शिबिरात मार्गदर्शन करताना न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड व मान्यवर


अंमली पदार्थ देशाच्या प्रगतीतील मोठा अडसर आहे त्याला वेळीच दूर केले पाहिजे – न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध्य तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस व बालकांचे अधिकार या संबंधी कायदेविषयक जनजागृती शिबिर शासकीय आश्रम शाळा बामणोली सावरी येथे आयोजन करण्यात आला. मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार जावली तालुका विधी सेवा समिती, जावली तालुका वकील संघ तसेच पंचायत समिती, मेढा, शासकीय आश्रम शाळा सावरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


    सदर शिबिरास जावली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश, मेढा डॉ. विक्रम आव्हाड, सातारा येथील ८ वे सह दिवाणी न्यायाधीश डॉ. संगीता विक्रम आव्हाड, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती जावली महेंद्र. प्र. सपाटे, सहा. पोलिस निरीक्षक मेढा पोलीस स्टेशन सुधीर  पाटील, गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती जावली संजय  धुमाळ,जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर एस पोफळे, सदस्य श्रीमती एन. एस. पवार, श्रीमती पी. डी. गोरे,  ए.ए.लकडे, तसेच न्यायालयीन कर्मचारी, मेढा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी, शासकीय आश्रम शाळा सावरी येथील सर्व शिक्षक उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी ८ वे सह दिवाणी न्यायाधीश डॉ. संगीता विक्रम आव्हाड यांनी बालकांचे अधिकार या विषयावर हसत खेळत मुलांना मार्गदर्शन केले.बालकांवर अन्याय, अत्याचार किंवा शोषण होत असल्याचे आढळल्यास महाराष्ट्र शासनाच्या टोल-फ्री १०९८ या ‘चाईल्ड हेल्पलाईन वर कॉल करून सांगितले पाहिजे. त्यानंतर श्रीमती एन. एस. पवार यांनी अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध्य तस्करी विरोधी दिनाचे महत्त्व विशद केले. त्याचे होणारे गंभीर दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन केले. श्रीमती पी. डी. गोरे यांनी बालकांचे अधिकार या विषयी विस्तृत मार्गदर्शन केले. श्री ए. ए. लकडे यांनी शिक्षणाचा अधिकार या विषयावर छोट्या छोट्या गोष्टी सांगून शिक्षणामुळे आपण कसे समृद्ध होतो असे सांगितले. बालमजुरीच्या समस्येबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विविध उदाहरणे दिली.

जावली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश, मेढा डॉ. विक्रम आव्हाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध्य तस्करी विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थ कशाला म्हटले पाहिजे, त्याने आपल्या मानवी जीवनावर काय परिणाम होतात. आपण त्याला विरोध कसा केला पाहिजे या विषयावर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तसेच मुलींनी आपल्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. येणार काळ हा महिलांसाठी खुप मोठ्या संधी घेऊन येणार आहे. त्यासाठी अगोदर मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे व स्वतःला आत्मनिर्भर केले पाहिजे त्यामुळे आपला देश विकसित होऊन पुढे जाईल. असे सांगितले. तेथील विद्यार्थ्यांनी घोडा टाळी, सोडा टाळी, टेलिफोन टाळी, एन एन एस टाळी वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.अतिशय सुंदर नियोजन व आयोजन करण्यात आलेले होते.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सपना  जांभळे यांनी तर आभार  शासकीय आश्रम शाळा सावरीचे मुख्याध्यापक  नेताजी  गायकवाड यांनी मानले . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेढा पोलिस स्टेशनचे कर्मचारी शासकीय आश्रमशाळेचे कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी.जावली पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांनी परिश्रम घेतले .



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)