मेढा - जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित शिबिरात मार्गदर्शन करताना न्या डॉ विक्रम आव्हाड. सोबत इतर
सामाजिक जीवन जगत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज - न्या डॉ विक्रम अंबादास आव्हाड
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )-
एक न्यायाधीश म्हणुन काम करत असताना मला माझे कर्मचारी, तसेच विधीज्ञ व पक्षकार यांच्या आरोग्याची काळजी सुध्दा केली पाहिजे. सामाजिक जीवन जगताना आजकाल प्रत्येकजण तणावाखाली जगत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले जीवनमान कसे उंचावले पाहिजे याविषयी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. असे प्रतिपादन जावली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्या डॉ विक्रम अंबादास आव्हाड यांनी केले .
मा. ना. सर्वोच्च न्यायालय , उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार दिवाणी व फौजदारी न्यायालय, मेढा येथे डॉक्टर विक्रम अंबादास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व जावली तालुका विधी सेवा समिती, वकील संघ तसेच ग्रामीण रुग्णालय मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते .
यावेळी जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर एस पोफळे, उपाध्यक्ष व्ही बी विधाते , श्रीमती एन एस पवार ,श्रीमती पी डी गोरे, एस एस मर्ढेकर, व्ही एन देशमुख, श्रीमती ए के शेटे , श्री. शिर्के, श्रीमती शेख, श्री पारंगे, श्रीनिवास कणसे सहा सरकारी वकील, ग्रामिण रूग्णालय मेढा चे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन पाटील व त्यांचे कर्मचारी संदिप गार्डे, अनिल मुंडे, सुहासनी महामुंने, अर्चना पवार, शितल सुतार, उपस्थित होते. तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन न्या डॉ विक्रम अंबादास आव्हाड यांनी केले. सदर शिबिरात बी.पी., शुगर, महिलांचे आरोग्य विषयक समस्या, रक्त तपासणी अशा विविध १५ आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. या शिबिरात एकूण ६० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यामध्ये अनेक विधीज्ञ, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी यांना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांवर उपचार करून औषधे देण्यात आली.
प्रारंभी जावली तालुका वकील संघाच्या सदस्य श्रीमती ए के शेटे यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले. श्रीमती एन एस पवार यांनी जागतिक आरोग्य संघटना करत असलेले कार्य व आपल्या देशातील वैदयकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे रूग्णांना होणारे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर एस पोफळे यांनी आज मेढा न्यायालयात झालेल्या शिबीरातबाबत गौरव उदगार काढले. सूत्रसंचालन पी. आर. लिंगडे यांनी केले. श्रीमती पी डी गोरे यांनी आभार मानले .

