महाराजस्व अभियानातून शासनाच्या योजना सर्वसामान्या पर्यंत पोहोचतात :- तहसीलदार प्रविण मुदगुल
सायगाव येथे जावली तालुक्यातील तिसरे महाराजस्व अभियान संपन्न
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना समाधान शिबीर टप्पा एक च्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अश्या शिबिराचे आयोजन जावली तालुक्यात करण्यात आले असून सायगाव ता जावली येथे तालुक्यातील तिसरे शिबीर संपन्न झाले असून एकत्रित पणे झालेल्या कामामुळे अनेक कामांचा जलद निपटारा होण्यास या अभियानातून मदत झाली असल्याचे प्रतिपादन जावलीचे तहसीलदार प्रविण मुदगुल यांनी केले.
सायगाव ता जावली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन आनेवाडी मंडल क्षेत्रासाठी करण्यात आले यावेळी सातारा जिल्हा परिषद सदस्या जयश्री गिरी, पंचायत समिती सदस्या चारुशीला पवार, नायब तहसीलदार सुनील मुनाळे, निसार शेख, जयश्री मोहिते, संजय बैलकर , भूमी अभिलेख उपधीक्षक शेवाळे, मंडल अधिकारी पंकज शिंदे , सरपंच बाळासाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नायब तहसीलदार सुनील मुनाळे व जिल्हा परिषद सदस्या जयश्री गिरी यांनी मनोगत व्यक्त केले
या शिबिरात सातबारा वाटप लक्ष्मी मुक्ती अंतर्गत महिलांच्या नावे असलेले डिजिटल सातबारा वाटप,संजय गांधी निराधार योजना अर्थ सहाय्य मंजुरी रेशन कार्ड विषयक लाभांचे वाटप,अंगणवाडी सेविकांच्या वतीने माता व बालकांच्या साठीच्या सेवांची अंमलबजावणी तसेच शालेय विद्यार्थी दाखले वाटप या सह अनेक योजनाचा कामाचा निपटारा या अभियानातून एक खिडकी योजनेतून झाल्याने परिसरातील अनेक नागरिकांनी महसूल विभागाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदिनी महाले, प्रतिभा पराड, दादासो कचरे, प्रशांत साबळे , प्रशांत कदम विभागातील सर्व तलाठी,पोलीस पाटील, कोतवाल, सरपंच तसेच सायगाव ग्रामपंचायत यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश जगताप व विशाल रेळेकर यांनी केले व आभार मंडल अधिकारी पंकज शिंदे यांनी मानले .


