म. गांधी वाचनालयाचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे....
राजेंद्र मोकाशी
पांडुरंग जवळ यांना " जीवनगौरव" तर राजेंद्र धनावडे यांना " जलयोद्धा " पुरस्कार वितरण......
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
वाचनाने माणूस समृद्ध होतो. जेवढे अधिक वाचन कराल तेवढे अधिक आपल्या ज्ञानामध्ये भर पडते.म. गांधी वाचनालयाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. वाचनालयाचे वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो ही अभिमानाची गोष्ट आहे. वाचनालयाच्या विविध उपक्रमास माझे निश्चितच सहकार्य राहील.असे आश्वासन माजी सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई राजेंद्र मोकाशी यांनी दिले.
म. गांधी वाचनालयाचे वतीने महिला दिनाचे औचित्य साधून
विविध पुरस्कार वितरण समारंभ, मेढा नगरपंचायतीचे नवनिर्वाचीत पदाधिकारी , नगरसेवक यांचा सत्कार समारंभ व नवोदितांचे काव्य संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन राजेंद्र मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. आनंद साठे, जेष्ठ पत्रकार / नाट्य व टिव्ही कलाकार धनराज जगताप, नगराध्यक्षा रूपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे,
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील कलश मंगल कार्यालयामध्ये सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रा. आनंद साठे, पत्रकार धनराज जगताप यांनी आपल्या मनोगतातून वाचनालयाचे उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी दत्ताआण्णा पवार, विकास देशपांडे, शितल करंजेकर प्रा. तुकाराम ओंबळे, सोमनाथ काशिलकर, सादिक सय्यद, सुर्यकांत देशमुख, संकेत पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे व संयोजकांचे कौतुक केले. तर पुरस्कार प्राप्त पांडूरंग जवळ व राजेंद्र धनावडे हे पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले, वाचनालयाचे कार्य खुप मोठे आहे. त्यांनी . आमचा सन्मान केला . तो कायम स्मरणात राहील असे सुचित केले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते मेढा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी, नगरसेवक यांचा सत्कार समारंभ व विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात करण्यात आले.म. गांधी वाचनालयाचे वतीने तालुका व जिल्हा पातळीवर विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देवून सन्मान केला जातो. चालू वर्षीचा मानाचा जलरत्न स्व. विजयराव मोकाशी यांचे स्मरणार्थ " "जलयोद्धा पुरस्कार " उद्योजक राजेंद्र धनावडे (केळघर ) तर मानाचा " जीवन गौरव पुरस्कार" पांडुरंग जवळ (मेढा ) यांना बहाल करण्यात आला.त्याचबरोबर वाचनालयाचे माजी अध्यक्ष कै. शामराव बापुराव क्षिरसागर यांचे स्मरणार्थ "जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार"-दीपक मुरलीधर लंगडे -ग्रंथपाल आजाद वाचनालय दहिवडी यांना तसेच स्व. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे (आदर्श शिक्षिका )यांचे स्मरणार्थ जिल्हास्तरीय "आदर्श शिक्षिका पुरस्कार " सौ. सुनीता अजय दिघे (आंबेघर तर्फ कुडाळ )-उपशिक्षिका भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर सातारा, माजी ग्रंथपाल कै.महादेव विश्वनाथ जंगम यांचे स्मरणार्थ जिल्हास्तरीय "आदर्श ग्रंथपाल पुरस्कार " - राजेंद्र काशिनाथ माने ग्रंथपाल श्री शिवछत्रपती वाचनालय सातारा,स्व. सौ.मंदाकिनी तुकाराम ओंबळे आदर्श शिक्षिका यांचे स्मरणार्थ"आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार "शाहीर श्रीरंग दिगंबर रणदिवे -सदर बाजार सातारा, स्व.इंदुमती केशवराव मोकाशी यांचे स्मरणार्थ _"आदर्श माता पुरस्कार" सौ.रत्ना रवींद्र शेलार ओखवडी ता. जावली,कै.लक्ष्मण सखारामशेठ काशीलकर (दादाशेठ ) यांच्या स्मरणार्थ " "यशस्वी उद्योजक पुरस्कार" विजय जगन्नाथ कारंजकर -अमृता उद्योग समूह, स्व.जनाबाई मारुती पार्टे यांच्या स्मरणार्थ " आदर्श माता पुरस्कार "श्रीमती लक्ष्मी ज्ञानेश्वर झोरे राहणार मेढा यांना,कै. विठ्ठल सावळा करंजेकर (गुरुजी ) यांचे स्मरणार्थ"आदर्श शिक्षिका पुरस्कार "सौ सुनीता प्रताप कामटे जि. प. शाळा ढेरेवाडी,कै. साहेबराव विठोबा देशमुख यांच्या स्मरणार्थ " आदर्श शेतकरी पुरस्कार".पांडुरंग महादेव देशमुख (गुरुजी ) मेढा,स्व.सावित्री सिताराम थत्ते ".आदर्श महिला वाचक पुरस्कार " सौ.गौरी रणजीत ओंबळे (मेढा ),कु. वर्षा सुदाम देशमुख (बिभवी ),श्रुती गोरखनाथ शिंदे
( बिभवी ) इ. विविध क्षेत्रातील व्यक्तींना संस्थेच्या वतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहेत. तर सायली शेलार हिची स्पर्धा परीक्षेतून कृषी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. प्रारंभी जयश्री माजगांवकर, प्रशांत लिंगडे यांच्या व जावली साहित्य प्रेमी यांच्या सहकार्याने " काव्य संमेलन संपन्न झाले.
कार्यक्रमास जावली बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे, व्हा.चेअरमन चंद्रकांत दळवी, संचालक वसंत तरडे, विश्वनाथ धनावडे, बाळासाहेब भालेघरे, आदिनाथ ओंबळे, एकनाथ ओंबळे, जि.प. सदस्या कविता ओंबळे, पं सं सदस्य आतिष कदम, डॉ. संपतराव कांबळे, कांतीभाई देशमुख, आनंदराव जुनघरे, मेढा नगरपंचायतीचे आरोग्य स्वच्छता सभापती नितीन मगरे, महिला व बालकल्याण सभापती आनंदी करंजेकर, नगरसेवक सुशांत कांबळे, सुनिता तांबे, पुष्पा मुकणे, छकुली देशमुख, सोनाली पवार, प्राजक्ता पार्टे, बापु जवळ, हरिशचंद्र तिवाटणे, शिवाजी गोरे, तेजस्वीनी इगावे, शर्वरी गायकवाड,धनंजय पवार, कृषि अधिकारी सायली शेलार,नारायण सुर्वे, मुरलीधर काशिलकर,प्रमोद पार्टे, जितेंद्र जगताप, मोहन जगताप, अनिल शिंदे, ह.भ.प. अतुलमहाराज देशमुख, विजय पिसाळ, विलास वरे, प्रितम क्षीरसागर यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.
प्रारंभी सरस्वती पुजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक नारायण शिंगटे, उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश पार्टे, उपस्थितांचे आभार रुपाली वारागडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश पार्टे,सचिव धनंजय पवार, कार्याध्यक्ष नारायण शिंगटे, सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्ष शोभा शेडगे, सहसचिव प्रकाश परांजपे, संचालक अशोक दिक्षीत, शशिकांत कदम, गणेश खताळ, शैला सपकाळ, स्वाती दिक्षीत, निलम मुळे, विठ्ठल देशपांडे, रघुनाथ जवळ, ग्रंथपाल आशा मगरे, इमताज शेख, माधवी कदम, दिक्षा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

