आंबेघर येथील आशिलमाल विकास सेवा सोसायटीची शंभर टक्के वसुली ; इतर सोसायट्यांनी या संस्थेचा आदर्श घेऊन शंभर टक्के कर्ज वसुली करावी - ज्ञानदेव रांजणे

0

 

केळघर - आंबेघर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना ज्ञानदेव रांजणे. समवेत  मोहनराव कासुर्डे, सूर्यकांत चिकणे, सागर धनावडे आदी


आंबेघर येथील आशिलमाल  विकास सेवा  सोसायटीची शंभर टक्के वसुली ; इतर सोसायट्यांनी या संस्थेचा आदर्श घेऊन शंभर टक्के कर्ज वसुली करावी - ज्ञानदेव रांजणे


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

 जावळी तालुका हा दुर्गम व डोंगराळ तालुका असला तरी विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पीककर्ज मुदतीत भरण्यासाठी शेतकरी   प्रयत्न करतात. त्यामुळे दुर्गम जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्या आर्थिकदृष्ट्या संपन्न होत असून सोसायट्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले. 

      बँक पातळीवर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली झालेल्या आंबेघर येथील आशिलमाल  विकास सेवा  सोसायटी च्या संचालक मंडळांचा सत्कार आज येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत करण्यात आला. त्यावेळी रांजणे बोलत होते.

          यावेळी जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी आर. एल. निकम, विकास अधिकारी ए. बी. खटावकर, वसुली आधिकारी संजय निकम, केळघर शाखा प्रमुख सूर्यकांत चिकणे, आंबेघर सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ शेलार, उपाध्यक्ष सुरेश शेलार, मोहनराव कासुर्डे, सागर धनावडे, अंकुश बेलोशे, केळघर सोसायटीचे सचिव आनंदा शेलार, आंबेघर चे सचिव विठ्ठल शेलार, वरोशीचे सचिव दिपक शेलार , संचालक अर्जुन जाधव,सुभाष शेलार, नामदेव शेलार , शामराव शेलार , राजाराम भिलारे , संपत शेलार , ज्ञानदेव शेलार, सिताराम कांबळे, जयश्री शेलार , हिराबाई शेलार , कोंडीबा कासुर्डे,महादेव राजगे, भगवान राजगे, जगन्नाथ शेलार , साहेबराव शेलार , प्रदीप कासुर्डे, ,तेजस कासुर्डे, अक्षय पवार ,संतोष शिर्के  आदींची उपस्थिती होती.यावेळी शंभर टक्के कर्जवसुली केलेल्या आंबेघर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा  सत्कार रांजणे यांच्या हस्ते करण्यात आला.


       यावेळी रांजणे म्हणाले, जावळी तालुक्यातील बिभवी, ओझरे, मामुर्डी, आंबेघर, गांजे, करंदी तर्फे कुडाळ, या सोसायट्या ची बँक पातळीवरील कर्ज वसुली १०० टक्के झाली असून तालुक्यातील इतर सोसायट्यांनी या संस्थांचा आदर्श घेऊन शंभर टक्के कर्ज वसुली करावी. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ शेलार यांनी सांगितले २१० सभासद असलेल्या या संस्थेने पहिल्याच वर्षी १ कोटी ५३ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करून शंभर टक्के वसुली केली आहे . यावेळी सोसायटीचे सभासद, शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)