महात्मा गांधी वाचनालयाच्या वतीने २९ मार्च रोजी
विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
मानाचा स्व. विजयराव मोकाशी " जलयोध्दा पुरस्कार " उद्योजक राजेंद्र धनावडे तर " जीवन गौरव पुरस्कार " पांडूरंग जवळ यांना जाहिर
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
जावलीची राजधानी मेढा येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय ( तालुका अ वर्ग ) या संस्थेच्या वतीने दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजीत केला जातो.सदरच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दि. २९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वा. कलश मंगल कार्यालय, मेढा ता. जावली येथे करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे, कार्याध्यक्ष नारायण शिंगटे व सचिव धनंजय पवार यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अध्यक्षतेखाली,मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी, लेखक, कवी प्रा. आनंद साठे, जेष्ठ पत्रकार, नाट्य व टिव्ही कलाकार धनराज जगताप, मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. रूपाली वारागडे ,उपनगराध्यक्ष विकास देशपांडे यांचे प्रमुख उपस्थतीमध्ये व साहित्य, सामाजिक, ग्रंथालय चळवळीतील मान्यवरांचे उपस्थिती मध्ये पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
" जावली साहित्य प्रेमी" यांच्या सहकार्याने दुपारी १२ ते १ या दरम्यान जावली तालुक्यातील नवोदीत कवींचे " काव्य संमेलन " संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वा. उपस्थीत मान्यवरांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा,मेढा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व नगरसेवकाचा सत्कार समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. म. गांधी वाचनालयाचे वतीने तालुका व जिल्हा पातळीवर विवीध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देवून सन्मान केला जातो. चालू वर्षीचा मानाचा जलरत्न स्व. विजयराव मोकाशी यांचे स्मरणार्थ " "जलयोद्धा पुरस्कार " उद्योजक राजेंद्र धनावडे (केळघर ) तर मानाचा " जीवन गौरव पुरस्कार" पांडुरंग जवळ (मेढा ) यांना जाहिर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाचनालयाचे माजी अध्यक्ष कै. शामराव बापुराव क्षिरसागर यांचे स्मरणार्थ "जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार"-दीपक मुरलीधर लंगडे -ग्रंथपाल आजाद वाचनालय दहिवडी यांना त्याच बरोबर स्व. सौ. मंदाकिनी तुकाराम ओंबळे (आदर्श शिक्षिका )यांचे स्मरणार्थ जिल्हास्तरीय "आदर्श शिक्षिका पुरस्कार " सौ. सुनीता अजय दिघे (आंबेघर तर्फ कुडाळ )-उपशिक्षिका भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर सातारा, माजी ग्रंथपाल कै.महादेव विश्वनाथ जंगम यांचे स्मरणार्थ जिल्हास्तरीय "आदर्श ग्रंथपाल पुरस्कार " - राजेंद्र काशिनाथ माने ग्रंथपाल श्री शिवछत्रपती वाचनालय सातारा,स्व. सौ.मंदाकिनी तुकाराम ओंबळे आदर्श शिक्षिका यांचे स्मरणार्थ"आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार "शाहीर श्रीरंग दिगंबर रणदिवे -सदर बाजार सातारा, स्व.इंदुमती केशवराव मोकाशी यांचे स्मरणार्थ _"आदर्श माता पुरस्कार" सौ.रत्ना रवींद्र शेलार ओखवडी ता. जावली,कै.लक्ष्मण सखारामशेठ काशीलकर (दादाशेठ ) यांच्या स्मरणार्थ " "यशस्वी उद्योजक पुरस्कार" विजय जगन्नाथ कारंजकर -अमृता उद्योग समूह, स्व.जनाबाई मारुती पार्टे यांच्या स्मरणार्थ " आदर्श माता पुरस्कार "श्रीमती लक्ष्मी ज्ञानेश्वर शेडगे राहणार मेढा यांना,कै. विठ्ठल सावळा करंजेकर (गुरुजी ) यांचे स्मरणार्थ"आदर्श शिक्षिका पुरस्कार "सौ सुनीता प्रताप कामटे जि. प. शाळा ढेरेवाडी,कै. साहेबराव विठोबा देशमुख यांच्या स्मरणार्थ " आदर्श शेतकरी पुरस्कार".पांडुरंग महादेव देशमुख (गुरुजी ) मेढा,स्व.सावित्री सिताराम थत्ते ".आदर्श महिला वाचक पुरस्कार " सौ.गौरी रणजीत ओंबळे (मेढा ),कु. वर्षा सुदाम देशमुख (बिभवी ),श्रुती गोरखनाथ शिंदे (बिभवी ) इ. विविध क्षेत्रातील व्यक्तींना संस्थेच्या वतीने पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे सल्लागार, सभासद . हितचिंतक, ग्रामस्थ,व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कुटूंबिय, नातेवाईक यांनी बहुसंख्येने उपस्थीत राहावे असे आवाहन वाचनालयाच्या सांस्कृतीक कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभा शेडगे, सहसचिव प्रकाश परांजपे, ग्रंथपाल आशा मगरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, कर्मचारी यांनी केले आहे.

