केळघर - मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निधीतून रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी शंकर बेलोशे. बबनराव बेलोशे, सुनील जांभळे, रवींद्र सल्लक, अंकुश बेलोशे, सचिन बिरामणे, सागर पार्टे आदी यांची प्रमुख उपस्थिती होती
केळघरमध्ये अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण-डांबरीकरण कामाला प्रारंभ
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून केळघर येथील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटी करण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच केळघरचे उपसरपंच शंकर बेलोशे यांच्या हस्ते झाला.बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून २५/१५ या योजनेतून केळघर येथील अंतर्गत रस्ता डांबरीकरण व काँक्रीटी करण साठी सुमारे ७० लाख एवढा भरीव निधी उपलब्ध झाल्याने केळघर या तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेच्या गावांत रस्ते मजबूत व दर्जेदार होऊन गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली.
या रस्त्याच्या कामाच्या प्रारंभी उपसरपंच शंकर बेलोशे, माजी सरपंच बबनराव बेलोशे, सुनील जांभळे, रवींद्र सल्लक श्रीपती बेलोशे,अंकुश बेलोशे,,सचिन बिरामणे, सागर पार्टे, बाजीराव पार्टे, मनोहर शिर्के ,तुकाराम धनावडे,रामचंद्र दळवी, सूर्यकांत चव्हाण,लक्ष्मण बिरामणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामास सुरुवात झाली आहे.
केळघर हे जावळी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असून सातारा-महाबळेश्वर या मुख्य रस्तावरील गाव आहे. केळघर गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून दिला असून येथील प्रलंबित कामे टप्याटप्याने पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार असून येथील रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीच्या समस्या कमी होऊन ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे .
- शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाममंत्री

