महिलांनी सक्षम होण्यासाठी कायद्यांची कास धरावी - न्यायाधीश डॉ संगीता आव्हाड. एक खंबीर महिलाच दुसऱ्या महिलेला खंबीर बनवू शकते - न्यायाधीश डॉ विक्रम आव्हाड.

0

 

जागतिक महिला दिनाच्या शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ विक्रम अंबादास आव्हाड व डॉ सौ.संगीता विक्रम आव्हाड.


महिलांनी सक्षम होण्यासाठी कायद्यांची कास धरावी - न्यायाधीश डॉ संगीता आव्हाड.

एक खंबीर महिलाच दुसऱ्या महिलेला खंबीर बनवू शकते - न्यायाधीश डॉ विक्रम  आव्हाड.

केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) -

मा. ना. सर्वोच्च न्यायालय मा. ना. उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार आखाडे ता . जावली येथे डॉ विक्रम अंबादास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व जावली तालुका वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ संगीता विक्रम आव्हाड न्यायाधीश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातारा, पंचायत समितीचे आर एस जगताप, जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष आर एस पोफळे, श्रीमती आर आर पवार, श्रीमती एन एस पवार ,श्रीमती पी डी गोरे, श्रीमती एस वाय निकम, वाय ए निकम, पंचायत समिती सदस्या सौ शिल्पा मिलिंद शिंदे, सौ एन ए सरकाळे मेरी एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक, सर्व टीचर्स. तसेच ग्रामीण रुग्णालय सोमर्डीचे वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मी मिना तसेच त्यांचा सर्व स्टाफ ,ग्रामविकास अधिकारी आखाडे, संरक्षण अधिकारी पंचायत समिती मेढा, ज्येष्ठ कवी, समाजसेविका जयश्री ताई माजगावकर, श्रीमती हेमलता आखाडे उपसरपंच, डॉक्टर रजीमा आकाश नलावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आखाडे व पंचक्रोशीतील सर्व महिला , ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मेरी एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे सोमर्डी ग्रामीण रुग्णालय , तालुका विधी सेवा समिती, जावली तालुका वकील संघ, आखाडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या शिबिराचे उद्घाटन डॉ संगीता विक्रम आव्हाड न्यायाधीश यांनी केले. सदर शिबिरात बीपी, शुगर, महिलांचे आरोग्य विषयक समस्या, रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ९० महिला व पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यांना त्यांच्या आरोग्य विषयक समस्यांवर उपचार करून औषधे देण्यात आली.

सदर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे सूत्र संचालन मेरी एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या टीचर श्रीमती स्नेहल अशोक जाधव यांनी केले.सुरूवातीला जावली तालुका वकील संघाच्या सदस्य श्रीमती पी डी गोरे यांनी महिलांना PCPNDT या विषयावर मार्ग दर्शन केले. तर श्रीमती एन एस पवार यांनी महिलांनी किती जागरूक राहिले पाहिजे. महिलांनी सक्षम होऊन आपल्या पावलावर उभे राहिले पाहिजे असे सांगितले. आखाडे गावाच्या एन ए सरकाळे यांनी आपल्या खुमासदार भाषेत अगदी अनादी काळापासून महिलाकडे कशी सत्ता होती याची छान पैकी उदाहरणे दिली. तसेच आज देखील महिला किती पुढे आहेत. याच्यावर देखील त्यांनी भाष्य केले. तसेच ज्येष्ठ कवियत्री सौ जयश्री माजगावकर यांनी महिलांनी आपले आरोग्य कसे जपले पाहिजे. स्वःताच्या खाण्या पिण्याकडं लक्ष दिले पाहिजे. महिला निरोगी असतील तर आपले घर व कुटुंब कसे व्यवस्थित ठेवतील या विषयी माहिती दिली. तसेच अनेक कवितांची उदाहरणे त्यांनी देऊन लहान मूल जसं आईला विचारल्या शिवाय काही करत नाही. त्या प्रमाणे मोठ्या मुलींनी किमान आपल्या आईची व वडिलांची परवानगी घेऊनच आपले पुढचे पाऊल उचलले पाहिजे. असे सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ सौ संगीता विक्रम आव्हाड यांनी महिलाना कायद्या सोबतच आपल्या घरातल्या महिलांना आपण कसे सन्मानाने वागवले पाहिजे. त्यामुळे होणारे क्लेश, भांडणे दूर होतील असे सांगितले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विक्रम अंबादास आव्हाड न्यायाधीश व जावली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष यांनी महिलांनी आपल्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर कसे झाले पाहिजे. एक खंबीर महिलाच दुसऱ्या महिलेला खंबीर बनवू शकते. आज महिला सक्षम होवून आपले कुटुंबा देखील चालवत आहेत. त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या कौटुंबिक समस्यांसाठी विधी सेवा प्राधिकरण आपणास सर्वतोपरी कसे मदत करेल या विषयी माहिती दिली. प्रत्येक समस्येवर उपाय असतो. तो उपाय फक्त आपण शोधला पाहिजे आणि सामंजस्याने आपल्या समस्या एकत्र बसून सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी मा. ना सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,उच्च न्यायालय मुंबई येथील महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, तसेच जिल्हा पातळीवरील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका पातळीवर तालुका विधी सेवा प्राधिकरण आपणास कसे मदत करू शकते , या बाबत उपस्थित महिलाना माहिती दिली.

तसेच मेरी एंजल्स इंग्लिश मिडिया स्कूल येथे राष्ट्रीय पातळीवरील 15100 या फलकाचे उद्घाटन झाल्यानंतर. हा नंबर कशासाठी आहे, हे सांगितले, हा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA - National Legal Services Authority) चा टोल-फ्री राष्ट्रीय कायदेशीर मदत हेल्पलाईन क्रमांक आहे. हा नंबर गरजू आणि दुर्बल घटकांना मोफत कायदेविषयक सल्ला आणि मदत (Free Legal Aid) मिळवून देण्यासाठी आहे, जो 24x7 उपलब्ध आहे.

महत्त्वाची माहिती:

उद्देश: कायदेशीर सल्ला, वकील मिळवून देणे, आणि मोफत कायदेशीर मदत.

कुणासाठी: गरीब, महिला, मुले आणि अत्याचारग्रस्त नागरिक.

सेवा: हा नंबर थेट स्थानिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) शी जोडतो. हा क्रमांक भारत सरकारद्वारे चालविला जातो, जो कायदेशीर मदतीसाठी एक हक्काचे व्यासपीठ आहे. असे सांगितले.

या कार्यक्रमास ग्रामस्थ , मेरी एंजल्स इंग्लिश मिडिया स्कूलचा स्टाफ , तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी उपस्थित होते.ॲड योगेश निकम यांनी आभार मानले .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)