"नगरसेवक आपल्या दारी " कु.प्राजक्ता पार्टे यांचा आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी महिला दिन साजरा. घरोघरी जावून हळदी कुंकू समारंभ,फळझाडे भेट देत, प्रभागातील समस्या जाणून घेतल्या

0

 

"नगरसेवक आपल्या दारी "

कु.प्राजक्ता पार्टे यांचा आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी महिला दिन साजरा.

 घरोघरी जावून हळदी कुंकू समारंभ,फळझाडे भेट देत, प्रभागातील समस्या जाणून घेतल्या


      मेढा : प्रतिनिधी -( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -       

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मेढा नगरपंचायत प्रभाग क्र.८ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या व प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांतजी शिंदे यांच्या कट्टर समर्थक नगरसेविका कु. प्राजक्ता पार्टे यांनी आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी महिला दिन साजरा केला. " नगरसेविका आपल्या दारी " हि संकल्पना राबवून, प्रभागातील प्रत्येक घरोघरी जावून " हळदी कुंकू " समारंभ साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रभागातील प्रत्येक घरोघरी फळझाड भेट देण्यात आले. तसेच प्रभागातील महिला व नागरीकांच्या समस्या तसेच विकास कामांच्या सुचना जाणून घेतल्या. असा आगळा वेगळा उपक्रम राबविल्या बद्धल प्रभागातील महिलांनी नगरसेविका कु.प्राजक्ता पार्टे ह्यांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


     याप्रसंगी जावली पंचायत समितीच्या सदस्यपदी विजयी झाल्याबद्दल सौ. शिल्पा शिंदे यांचा महिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


          या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या जावली पंचायत समिती सदस्या सौ. शिल्पा शिंदे यांच्या शुभहस्ते नगरसेविका कु. प्राजक्ता पार्टे, सुनिता पार्टे, अॅड पुनम गोरे, छाया कदम, आशा नलवडे, नारायण शिंगटे, नारायण दळवी,सुरेश पार्टे, डॉ.मिलींद शिंदे, प्रकाश कदम, रामचंद्र मोरे, राजेंद्र नलवडे, मोहन देशमुख, नितीन देशमुख,मंगेश पार्टे, सिध्देश मोरे, सुनिल गांगुर्डे, वरद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वनिता मोरे, दुर्गा मोरे, शारदा पवार, कमल शिंगटे, अबोली पार्टे, विमल जाधव, तनवी मोरे, सिद्धी पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

       

    

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)