अभियानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे - जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

0

 

केळघर - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात मार्गदर्शन करताना वैशाली राजमाने. समवेत प्रवीण मुदगुल, सुनील मुनाळे, निसार शेख,अरुणा शेवाळे आदी


अभियानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी महसूल विभागाच्या  अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे - जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी,विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन  प्रश्नांचे  निराकरण जागेवरच काढणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडल स्तरावर राज्य शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबवले जात असून या अभियानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी महसूल विभागाच्या  अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे असे आवाहन जिल्हा पुरवठा आधिकारी वैशाली राजमाने यांनी केले.

जिल्हा पुरवठा आधिकारी वैशाली राजमाने यांच्या  मार्गर्शनाखाली  केळघर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 चे आयोजन  नुकतेच करण्यात  आले होते.या  शिबिरास  तहसीलदार  प्रवीण  मुदगुल, निवासी नायब तहसीलदार  सुनील मुनाळे, महसूल नायब तहसीलदार  निसार शेख, भूमी अभिलेख च्या उपअधीक्षक    अरुणा शेवाळे ,  मंडळ अधिकारी  संतोष भोसले,  तलाठी संदीप ढाकणे, सुनीता सूर्यवंशी ,बाळासाहेब करचे, शीतल गुजर, केळघरचे उपसरपंच शंकर बेलोशे, भाजपचे तालुका सरचिटणीस अंकुश बेलोशे, यांच्यासह  मंडलातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच  , रास्त भाव दुकानदार   उपस्थित होते.



  यावेळी तहसिलदार प्रविण मुदगुल म्हणाले,जावली तालुक्यात महाराजस्व अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे . या अभिनयाच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेचे प्रलंबित  प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये राजस्व अभियान राबविणार आहे .

      या अभियानात शालेय विद्यार्थी यांना रहिवासी दाखले, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, वाटप करणेत आले. तसेच ग्रामस्थ शेतकरी यांच्या अ.पा.क. नोंदी, एकूम्या नोंदी, वारस नोंदी, इतर अधिकार मधील पोकळ बोजा नोंदी, यांचे निर्गती करून जागेवरच वितरण करण्यात आले, संजय गांधी योजना मंजुरी आदेश तसेच फार्मर आय डी आधार कार्ड याची कामे जागेवरच वितरित करण्यात आले.  तलाठी संदीप ढाकणे यांनी आभार मानले .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)