शिवथर येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात
ग्रामीण विकास प्रत्येक वाडीत पोहोचवण्याचा संकल्प – सदाभाऊ खोत
शिवथर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )
ता. जि. सातारा येथील शिवथर गावात अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. ८ जानेवारी २०२६) मोठ्या उत्साहात पार पडले. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते या विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “विकास फक्त शहरापुरता मर्यादित न राहता तो गावाच्या प्रत्येक वाडीत पोहोचला पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे.” ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, सुकर व दर्जेदार रस्त्यांची सुविधा मिळावी, या उद्देशाने गावागावात निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गी लावली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या रस्ता काँक्रिटीकरण कामामुळे शिवथर गावातील अंतर्गत दळणवळण अधिक सुलभ होणार असून ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय होणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशी मूलभूत कामे प्राधान्याने राबवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या भूमिपूजन कार्यक्रमास ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य श्री. सचिन नलावडे, रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते श्री. किरण उथळे, सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री. मधुकर जाधव, शिवथर गावच्या सरपंच सौ. प्रिया साबळे, उपसरपंच श्री. दत्तात्रय साबळे, श्री. प्रकाश साबळे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.

