केळघर परिसरात यात्रांचा हंगाम सुरू

0

 

। ग्रामदैवत श्री. भैरवनाथाच्या नावानं चांगभलं ।


केळघर परिसरात यात्रांचा हंगाम सुरू


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - परिसरात यात्रांचा हंगाम सुरू झाला असून आंबेघर येथील ग्रामदैवत आशीलमालाची यात्रा उद्या शुक्रवारी व शनिवारी अशी दोन दिवस होणार आहे. यात्रे निमित्त कुस्त्यांच्या जंगी फड व विविध मनोरंजन व धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली. उद्या शुक्रवारी आशीलमाल व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होणार असून शनिवार हाआंबेघर येथील यात्रेचा मुख्य दिवस आहे. आसनी येथील ग्रामदैवत आशीलमालाची वार्षिक यात्रा असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते सागर धनावडे यांनी दिली. केळघर येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा शनिवार (ता३)व रविवार (ता:४ )रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होत आहे .अशी माहिती उपसरपंच शंकर बेलोशे यांनी दिली.

     शनिवार ता: ३ रोजी रात्री भैरवनाथ देवाची पालखीतून मिरवणुक , सासनकाठी भेट , छबिन्याचा कार्यक्रम होणार आहे तर रविवार दि . ४ रोजी करमणूक कार्यक्रम , जंगी कुस्त्यांचा फंड होणार आहे .रविवार हा येथील यात्रेचा मुख्य दिवस आहे.यावर्षी यात्रा शनिवार व रविवारी असल्याने यात्रेमुळे मुंबईकर मंडळी मोठ्या प्रमाणावर येत असून परिसरातील गावांच्याही यात्रा आहेत त्यामुळे परिसरासह, बाजारपेठेत लगबग वाढली आहे.यात्रेच्या नियोजनासाठी यात्रा समित्यांची लगबग वाढू लागली आहे.

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)