सावली येथे ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या वाढदिनी महाआरोग्य शिबीर व विविध कार्यक्रमांचे आयोजन
केळघर: प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) - सावली ता जावळी येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या वाढदिनी महाआरोग्य शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर रक्तदान शिबीर, आधारकार्ड शिबीर व जेष्ठ नागरीक ओळखपत्र वाटप शिबीर अश्या विविध समाजउपयोगी कार्यक्रमांचे आयोजन सावली ता जावळी येथे शुक्रवार २ जानेवारी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत करण्यात आले असल्याची माहिती सरपंच विजय सपकाळ यांनी दिली असून सर्वांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन सावली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे .
मुख्यमंत्री समुद्ध ग्राम अभियानाअंतर्गत नववर्षाच्या प्रारंभी जिल्हा बँकेचे संचालक व तालुक्याचे वैभव श्रीमान ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे महाशिबीर होत आहे .
यामध्ये पुणे येथील जागतिक सुप्रसिध्द आय हॉस्पीटल एच व्ही देसाई हॉस्पीटल यांच्या माध्यमातून तज्ञ नेत्र चिकित्सक यांच्याकडून मोफत डोळे तपासणी करून मोफत मोतीबिंन्दू शस्त्रक्रिया तसेच डोळयाच्या इतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत .
तसेच लोकनेते रांजणे साहेबांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त ५० + रक्तदात्यांचे रक्तदान शिबीर होणार असून बालाजी ब्लड बँकेच्या सहकार्यातून होणार असून प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेट वस्तू वाटप होणार आहे .
त्याचबरोबर आधारकार्डचा या ठिकाणी कॅम्प घेतला आसून यामध्ये आधारकार्ड अपडेड , आधारकार्ड लिंक, दुरुस्ती करण्यात येणार आहेत . त्यामुळे आपल्या आधारकार्डची कामे करून घ्यायची आहेत .
तसेच ६५ वर्षावरील जेष्ठांना शासकीय जेष्ठ नागरीक ओळखपत्र देण्यात येणार आहे . यासाठी जेष्ठ नागरीकांनी येताना एक आयकार्ड फोटो,
तलाठी रहिवाशी दाखला, रेशनकार्ड व आधारकार्ड ची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला , दाखला नसेल त्यांनी शासकीय रुग्णालयातून वयाचा दाखला सोबत घेवून यायचा आहे .
या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत, सावली, ग्रामस्थ मंडळ, अजिंक्य नेहरू युवा मंडळ, श्री काळेश्वरी प्रतिष्ठान जन्मभूमी सेवा मंडळ , सावली यांच्यावतीने करण्यात आले आहे .

