जावलीच्या तहसिलदारपदी प्रविण मुदगुल यांची नियुक्ती

0

 

जावलीच्या  तहसिलदारपदी प्रविण  मुदगुल यांची नियुक्ती,

हणमंत कोळेकर यांची नांदेडला बदली


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - जावली तहसिलदारपदी प्रविण  मुदगुल यांची नेमणूक तर येथील तहसिलदार हणमंत कोळेकर यांची नांदेड येथे प्रांत अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे .

    प्रविण मुदगुल हे मुळ्चे सोलापूर येथील असून यापूर्वी त्यांनी श्रीगोंदा ( अहिल्यानगर ) येथे अप्पर तहसिलदार म्हणून कामकाज पाहिले आहे . आज त्यांचे रास्त भाव धान्य दुकानदार संघटना , तलाठी , कर्मचारी संघटना तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले .

    सर्वांना सोबत घेऊन शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागाळात पोचवून सामान्य जनतेला महसूल विभाग आपलासा वाटण्यासाठी काम करणार असल्याचे यावेळी मुदगूल यांनी सांगितले .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)