मेढा न्यायालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न. ग्राहकांना आपल्या हक्काची व अधिकारांची जाणीव असली पाहिजे..-न्यायाधीश डॉ विक्रम आव्हाड

0

 

मेढा न्यायालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त  कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलताना डॉ विक्रम  आव्हाड व इतर


मेढा न्यायालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न 

ग्राहकांना आपल्या हक्काची व अधिकारांची जाणीव असली पाहिजे..-न्यायाधीश डॉ विक्रम  आव्हाड


केळघर: प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) -

 मा. ना. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये  तालुका विधिसेवा समिती जावली , तालुका वकील संघ मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त  कायदेविषयक मार्गदर्शन विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

   त्याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. विक्रम आव्हाड, सहाय्यक सरकारी अभियोक्त श्रीनिवास कणसे, जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ आर. एस. पोफळे, ज्येष्ठ वकिल श्री वीर, श्री डी पी धुमाळ ,श्री ए.ए लकडे, श्री शिर्के,  श्रीमती पी. डी. गोरे ,श्रीमती  ए. के. शेटे, श्रीमती गोरे,श्री कांबळे, श्री शिंदे इत्यादी उपस्थीत होते.

  सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विधिज्ञ ए ए लकडे यांनी केले. श्रीमती पी डी गोरे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त दिन व त्याचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले, वाई बारचे विधीज्ञ  डी पी धुमाळ यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला पाहिजे त्याचे महत्व काय आहे याविषयी उपस्थीतांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे डॉ. विक्रम  आव्हाड, अध्यक्ष जावली तालुका विधी सेवा समिती मेढा यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन (National Consumer Day) हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो,  या दिवशी, १९८६ मध्ये, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणारा 'ग्राहक संरक्षण कायदा' संमत झाला. हा दिवस ग्राहकांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्यासाठी, फसवणुकीपासून संरक्षण देण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी साजरा होतो, ज्यामुळे प्रत्येक ग्राहक सक्षम होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देऊ शकेल. ग्राहक संरक्षण: हा दिवस ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी (सुरक्षितता, माहिती मिळवणे, निवड करणे, तक्रार करणे) जागरूक करतो आणि अनुचित व्यापारापासून त्यांचे संरक्षण सुनिश्चित करतो.

कायद्याची अंमलबजावणी: १९८६ च्या कायद्यामुळे ग्राहकांना प्रथमच कायदेशीर आधार मिळाला, ज्यामुळे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक मंच स्थापन झाले. जागरूकता आणि सजगता: हा दिवस ग्राहकांना योग्य वस्तू निवडण्यास, फसवणूक टाळण्यास आणि जबाबदार ग्राहक बनण्यास प्रोत्साहित करतो.

अर्थव्यवस्थेचा कणा: ग्राहक हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असतो, म्हणून त्यांचे हित जपणे महत्त्वाचे आहे, असे या दिनानिमित्त सांगितले. यंदाची राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम ही “डिजिटल न्याय प्रक्रियेद्वारे कार्यक्षम आणि जलद गतीने प्रकरणाचा निपटारा करणे ” अशी आहे.


सदर कार्यक्रमाचे आभार  श्रीमती ए के शेटे यांनी केले. सदर कार्यक्रमा करीता सहा अधिक्षक  एम एस मोरे, वरिष्ठ लिपीक संभाजी पालखे,  अवधुत कूलकर्णी,  प्रशांत लिंगडे,  महेश पवार, श्रीमती काजल ओंबळे,  जयेश केंजळे, श्री आवटे, श्रीमती करंजेकर यांनी परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)