मेढा न्यायालयात जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न. मानव अधिकार म्हणजे असे अधिकार ज्यांच्या शिवाय आपण मानव म्हणून जगूच शकत नाही..- डॉ विक्रम अं आव्हाड

0

 

मेढा न्यायालयात जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलताना डॉ विक्रम  आव्हाड सोबत श्रीनिवास कणसे , हणमंत कोळेकर , राम जगताप , आर एस पोफळे

मेढा न्यायालयात जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न.

मानव अधिकार म्हणजे असे अधिकार ज्यांच्या शिवाय आपण मानव म्हणून जगूच शकत नाही..- डॉ विक्रम अं आव्हाड

केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) -

मा. ना. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये  आदेशान्वये तालुका विधिसेवा समिती जावली तालुका वकील संघ मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

   त्याप्रसंगी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. विक्रम आव्हाड, सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीनिवास कणसे, तहसिलदार हणमंत कोळेकर, पंचायत समितीची अतिरिक्त गटविकास अधिकारी राम जगताप, जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ आर. एस. पोफळे, ज्येष्ठ वकीलवर्ग एम. एस. माने, व्ही. जी. महाडिक, ए.ए. लकडे, श्रीमती शिर्के,  श्रीमती पी. डी. गोरे ,श्रीमती  ए. के. शेटे, श्रीमती एन एस पवार, इत्यादी उपस्थीत होते.

  सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विधिज्ञ श्रीमती पी डी गोरे यांनी केले. तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी मानवी हक्क दिन व त्याचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले, श्री विधीज्ञ व्ही. जी. महाडीक यांनी मानवी हक्क दिन का साजरा केला पाहिजे त्याचे महत्व काय आहे याविषयी उपस्थीतांना मार्गदर्शन केले तसेच विधीज्ञ ए ए लकडे यांनी जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त आपले हक्क कसे जपले पाहिजेत यावी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे डॉ. विक्रम अंबादास आव्हाड, अध्यक्ष जावली तालुका विधी सेवा समिती मेढा यांनी १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली, या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो. १९५० पासून याची औपचारिक सुरुवात झाली. मानवी हक्क दिन (Human Rights Day) १० डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जो १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (UN) स्वीकारलेल्या 'मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणे'च्या (Universal Declaration of Human Rights - UDHR) स्मरणार्थ आहे, या दिवशी जगभरातील लोकांच्या मूलभूत हक्कांबद्दल जागरूकता पसरवली जाते, ज्यात जीवन, स्वातंत्र्य, शिक्षण आणि समानतेचा अधिकार यांसारख्या हक्कांचा समावेश आहे. सन २०२५ ची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाची संकल्पना ही ”मानवी हक्क, आपल्या दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी," ही आहे. याबाबत उपस्थिताना अवगत करून दिले.

                  सदर कार्यक्रमा करीता सहा. अधिक्षक एम एस मोरे, न्यायालयीन कर्मचारी संभाजी पालखे, अवधुत कूलकर्णी, प्रशांत लिंगडे, महेश पवार, काजल ओंबळे, जयेश केंजळे, सागर मोरे, आवटे, आकाश साबळे, करंजेकर यांनी परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)