दिव्यांग लाभार्थीनी युडीआयडी कार्डचा नंबर डीबीटीत जमा करण्याचे तहसिलदार यांचे आवाहन

0

 


दिव्यांग लाभार्थीनी युडीआयडी कार्डचा नंबर डीबीटीत जमा करण्याचे तहसिलदार यांचे आवाहन

केळघर : प्रतिनिधी-( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज )-

जावली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून लाभ घेत असलेल्या व ज्या दिव्यांग लाभार्थीकडे युडीआयडी कार्ड आहे अशा दिव्यांग लाभार्थीनी युडीआयडी कार्डचा नंबर डीबीटीत नमूद करण्यासाठी युडीआयडी कार्डची व आधारकार्डची छायांकीत प्रत संजय गांधी शाखेत जमा करावी. तसेच ज्यांचे युडीआयडी कार्ड नाही त्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या आत युडीआयडी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी केले आहे.

   संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून सर्व दिव्यांग लाभार्थीना यापूर्वी १ हजार ५०० इतके अनुदान दिले जात होते. शासन निर्णय दि. १५ सप्टेंबर २०२५ अन्वये आक्टोंबर २०२५ पासून दिव्यांग लाभार्थीचे मासिक अर्थसहाय्य १ हजार ५०० वरून ते दरमहा रुपये २ हजार ५०० करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या झालेल्या पेन्शन वाढीचा लाभ दिव्यांग लाभार्थीना मिळण्यासाठी डीबीटीमध्ये (हायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर) युडीआयडी (युडीआयडी) कार्डचा नंबर नमुद करणे आवश्यक आहे.

त्याशिवाय सदरच्या पेन्शन वाढीचा लाभ दिव्यांग लाभार्थीना मिळणार नाही.

    तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून लाभघेत असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थीना आवाहन केले जात आहे की, ज्या दिव्यांग लाभार्थीकडे युडीआयडी कार्ड आहे अशा दिव्यांग लाभार्थीनी

युडीआयडी कार्डचा नंबर डीबीटीत नमूद करण्यासाठी युडीआयडी कार्डची छायांकीत प्रत व आधारकार्डची छायांकीत प्रत जावलीच्या संजय गांधी विभागाच्या शाखेत जमा करावी.

तसेच ज्या दिव्यांग लाभार्थनि अद्याप युडीआयडी कार्ड काढले नाही अशा दिव्यांग लाभार्थीनी जिल्हा शल्यचिकित्सक सातारा यांनी दिलेल्या खालील वेळापत्रकानुसार अस्थिव्यंग असणाऱ्या दिव्यांग लाभार्थीनी जिल्हा रुग्णालय सातारा येथील ओपीडी नं. १०७ येथे नेमून दिलेल्या वाराच्या दिवशी व वेळी उपस्थित राहून एक महिन्याचे आत युडीआयडी कार्ड काढून घ्यावे.

अस्थिव्यंग यांनी प्रत्येक शुक्रवारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे सकाळी ९ वाजता, मतिमंदत्व यांनी प्रत्येक बुधवारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे सकाळी ९ वाजता, नेत्र लाभार्थीनी प्रत्येक सोमवारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे सकाळी ९ वाजता. कर्णबधिर यांनी प्रत्येक गुरूवारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहनही तहसिलदार यांनी केले आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)