भारतीय संविधानाचा ७६ वर्धापन दिन मेढा न्यायालयात दिपोत्सव करुन साजरा. संविधानाने दिलेले हक्क प्रत्येकाने अंगीकृत करुन घेतले पाहिजेत - श्री. आर. आर. मावतवाल

0

 


भारतीय संविधानाचा ७६ वर्धापन दिन मेढा न्यायालयात दिपोत्सव करुन साजरा.

संविधानाने दिलेले हक्क प्रत्येकाने अंगीकृत करुन घेतले पाहिजेत -  श्री. आर. आर. मावतवाल


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) -

 मा. ना. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती जावली मेढा व जावली तालुका वकील संघाच्यावतीने भारतीय संविधानाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त कायदेशीर जनजागृती शिबीर व दिपोत्सव श्री. आर. आर. मावतवाल, दिवाणी न्यायाधीश व.स्तर सातारा, डॉ. विक्रम अं .आव्हाड, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा, श्री एन. एम. शितोळे, श्रीमती. एस. व्ही. आव्हाड दिवाणी न्यायाधीश, क. स्तर सातारा यांच्या उपस्थीतीत दिवाणी न्यायालय क.स्तर मेढा येथे पार पडला.

          सदर दिपोत्सवाचे उदघाटन श्री. आर. आर. मावतवाल यांनी केले. संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाची उददेशीका , मूळ भारतीय संविधानात दर्शविलेली विविध चित्रणे व त्यामागील इतिहास, या माहिती फलकाचे अनावरण श्री. आर. आर. मावतवाल, दिवाणी न्यायाधीश व.स्तर सातारा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मूळ संविधानातील २२ भागांच्या सुरुवातीला रेखाटलेले चित्रण-देखावे यांचे सादरीकरण करणारे फलक तयार करुन संविधानाचा इतिहास, महत्व आणि त्यातील मुख्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयाेजनामागील उद्यीष्ट नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जनजागृती करणे आणि संविधानाचे महत्व पटवून देणे होते. सदर दिपोत्सवात भारतीय संविधानाचा ७६ वा वर्धापन दिनानिमित्त एकुण ७६० दिप लावून दिपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. ए. के. शेटे, जावली तालुका वकील संघाच्या सदस्या यांनी केले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री आर. आर. मावतवाल दिवाणी न्यायाधीश व.स्तर हे होते, सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री एन. एम. शितोळे, श्रीमती.एस. व्ही. आव्हाड हे होते. त्यावेळी श्री आर. एस. पोफळे अध्यक्ष, जावली तालुका वकील संघ मेढा यांनी संविधान दिन का साजरा करावा त्याचे महत्व काय आहे. या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती एन. एस. पवार, सदस्या जावली तालुका वकील संघ यांनी संविधानातील मार्गदर्शक तत्वे व संविधानामुळे आपल्या आपले अधिकारी कसे प्राप्त झाले आणि आपल्या अधिकाराचा वापर कसा करावा या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे श्री एन. एम. शितोळे यांनी संविधाना बाबत अगदी साध्या सोप्या भाषेत पण विश्लेषानात्मक मार्गदर्शन केले. कुमार अथर्व विक्रम आव्हाड यांनी देखील संविधाना दिना निमित्त अभ्यासपुर्ण मार्गदर्शन पर भाषाण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आर. आर. मावतवाल, दिवाणी न्यायाधीश व.स्तर सातारा यांनी भारतीय संविधानाच्या ७६ वर्धापन दिनानिमित्त केलेल्या दिपोत्सवाचे तोंडभरुन कौतुक केले. संविधानाचे महत्व किती आहे. ते आपण कसे अंगीकृत करुन घेतले पाहिजे व त्याचा वापर स्वतःच्या व इतरांच्या कल्याणासाठी कसा केला पाहिजे. संविधान किती श्रेष्ठ आहे. या बद्दल मार्गदर्शन केले. 

 या कार्यक्रमाचा समारोप व कार्यक्रमाचे आयोजनकर्ते डॉ. विक्रम अंबादास आव्हाड, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांनी उपस्थीतांना संविधान दिन म्हणजे इतर सणांइतकाच महत्वाचा दिवस आहे. संविधान कशापध्दतीने तयार झाले. या बाबत सविस्तर सांगून त्याची ऐतिहासिक पाशर्वभुमी आणि त्यामागील मुल्ये नागरिकांना समजावून देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने संविधान दिवस आपल्या सणांप्रमाणे  साजरा केला पाहिजे.  तसेच या कार्यक्रमास उपस्थीतित राहील्या बद्दल  श्री आर. आर. मावतवाल दिवाणी न्यायाधीश व.स्तर सातारा , श्री एन. एम. शितोळे,  श्रीमती.एस. व्ही. आव्हाड, दिवाणी न्यायाधीश क.स्तर सातारा. श्री  कणसे. सहा. सरकारी वकील मेढा, श्री आर एस पोफळे अध्यक्ष जावली तालुका वकील संघ व श्री व्ही व्ही विधाते उपअध्यक्ष जावली तालुका वकील संघ व त्यांचे सन्माननीय विधीज्ञ श्री.माने , श्री गोळे, श्री वीर, श्री देशमुख, श्री देशमुख,  श्रीमती. शेटे, श्रीमती पवार, श्री पारंगे, श्री जाधव, श्री शिर्के यांचे आभार मानले. 

 सदर कार्यक्रमाकरीता दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे श्री एस. एम. मोरे सहा. अधिक्षक, श्री ए. डी कुलकर्णी व. लिपीक, श्री एस एस पालखे व. लिपीक, श्री पी आर लिंगडे क. लिपीक, श्री पवार क. लिपीक, श्रीमती. ओंबळे क. लिपीक , श्री केंजळे संगणक सहाय्यक व श्री बढेकर, श्री साबळे, श्री आवटे तसेच विधी स्वयंसेवक श्री ऋशिकेश शिंदे, कु. श्रावणी काशिलकर, कु. जाधव यांनी भारतीय संविधानाच्या ७६ व्या  वर्धापन दिनानिमित्त मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)