केळघर - पर्यावरण पूरक घरच्या घरी गणेश विसर्जन करताना शुभम गाडवे. समवेत शंकर बेलोशे,ज्ञानेश्वर बेलोशे, आनंदा बेलोशे, दिलीप गाडवे आदी
केळघर मधील गाडवे कुटुंबियांनी पर्यायी जलकुंडात गणेश मूर्ती विसर्जन करत दिला पर्यावरणाचा संदेश
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज) - जिल्हा परिषदेच्यावतीने यंदा पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यात आले होते. नदीत गणेश विसर्जन न करता पर्यायी जलकुंडात करावे यामुळे प्रदूषण टाळता येते असे आवाहन जिल्हा परिषदेने केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील शुभम दिलीप गाडवे यांनी आपल्या घरातील गणेशाचे विसर्जन घरच्या घरी पर्यावरण पूरक पद्धतीने पाण्याच्या मोठया भांड्यात केले.यावेळी उपसरपंच शंकर बेलोशे,ज्ञानेश्वर बेलोशे, आनंदा बेलोशे, दिलीप गाडवे, अक्षय बेलोशे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.


