दापवडी पंचक्रोशी विकास संस्था महू धरणग्रस्तांच्या पाठीशी कायम राहणार ; वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव

0

 

बेलोशी : सभेत मार्गदर्शन करताना नितीन गावडे, , संजय बेलोशे व इतर 


दापवडी पंचक्रोशी विकास संस्था महू धरणग्रस्तांच्या पाठीशी कायम राहणार ; वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव  



केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - महू धरणाच्या पाण्यासाठी राजकारण चालू असताना आज दापवडी, बेलोशी, रांजणी, वहागाव, शिंदेवाडी , घोटेघर आणि रुईघर कार्यक्षेत्र असणाऱ्या दापवडी पंचक्रोशी विकास संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महू धरणग्रस्तांच्या सर्व समस्या सोडवणुकीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे कायम राहणार असल्याचा ठराव पंचक्रोशी संस्था कायम पाठीशी ठाम राहणार असल्याचा ठराव करण्यात आला.


बेलोशी (ता. जावळी) येथील दत्तात्रय कळंबे महाराज यांच्या समाधीस्थळावर आज दापवडी पंचक्रोशी सामाजिक संस्था आणि बहुउद्देशीय पर्यटन सामाजिक संस्थेची संयुक्तिक वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. 

या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय बेलोशे व प्रकाश रांजणे हे होते. यावेळी नितीन गावडे, दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, काटवली सोसायटीचे चेअरमन शंकर पवार , वसंतराव बेलोशे , यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 पंचक्रोशी विकास संस्थेच्या सांस्कृतिक भवनासाठी आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिलेबद्दल त्यांचे अभिनंदन करून लवकरच या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्याविषयी व निधी उपलब्धतेसाठी साधक बाधक चर्चा करण्यात आली.  


दापवडी, बेलोशी,रांजणी, वहगाव , काटवली, शिंदेवाडी, रुईघर, घोटेघर गावचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पंचक्रोशी संस्थेने महू धरण क्षेत्रात पर्यटक विकासाला चालना मिळावी तसेच एकसंधपणे परिसराचा विकास व्हावा दृष्टीने या संस्थेची स्थापना कै. ज्ञानदेव चोरट यांनी केली. ज्ञानदेव चोरट यांनी पाहिलेले पंचक्रोशी भवनाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्वजण एकवटले असून आ. छ्त्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या भवनासाठी भरीव निधीची तरतूद केले असल्याची माहिती यावेळी नितीन गावडे यांनी दिली.


 महू धरण बाधित क्षेत्रात पर्यटन विकास व्हावा, जलाशयात बोटिंग सोय झाल्यास आपोआप पर्यटक येतील आणि याबरोबरच सर्व गावांचा विकास व्हावा, युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेने जास्त भर द्यावा असे यावेळी अनेकांनी सूचित केले.  


यावेळी शिंदेवाडी सरपंच धनंजय शिंदे, काटवली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शंकरराव पवार , वहागाव उपसरपंच अरुण रांजणे, माजी सरपंच हणमंत रांजणे,नारायण जाधव, शंकर बेलोशे, चंद्रकांत बेलोशे, साहेबराव गोळे, महादेव बेलोशे, बबनराव शिंदे, अंकुश बेलोशे, शिवाजी बेलोशे, वसंत रांजणे, वसंतराव बेलोशे ,विश्वास रांजणे, ज्ञानेश्वर रांजणे, रांजणी माजी सरपंच बाबुराव सपकाळ, सुनील बेलोशे , बेलोशी सरपंच उमेश बेलोशे, अक्षय रांजणे तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद व नागरिक उपस्थित होते. 

चंद्रकांत बेलोशे यांनी संस्थेचा ताळेबंद, नफा तोटा पत्रकांचे वाचन केले. नितीन गावडे यांनी सूत्रसंचलन केले. तर संजय बेलोशे यांनी आभार मानले.

        सात गाव पंचक्रोशीच्या विकासासाठी स्थापन झालेल्या या संस्थेच्या सभेत आज धरणग्रस्तांचे प्रश्न, तसेच धरणग्रस्तांचे सातबाऱ्यावर हस्तांतर शासनाचे शिक्के असल्याने ते शिक्के तातडीने काढून सातबारा कोरा करावा, रांजणी गावचा रिंग रोड तातडीने व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ही प्रश्न सोडवण्यासाठी संस्था धरणग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभी राहील असे ठरवण्यात आले.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)