वसंतराव मानकुमरे यांच्या आंदोलनाला महू धरणग्रस्तांचा विरोध ; धरणावर येऊन केला निषेध व्यक्त ; आंदोलनात एकही प्रकल्पग्रस्त सहभागी होणार नाही

0

 

महू : अशा प्रकारे धरणग्रस्तांनी आंदोलनाचा निषेध करीत पुनर्वसन प्रश्न सुटल्याशिवाय पाण्याचा थेंबही सोडणारा नाही असा निर्धार व्यक्त केला 



वसंतराव मानकुमरे यांच्या आंदोलनाला महू धरणग्रस्तांचा विरोध ; धरणावर येऊन केला निषेध व्यक्त ; आंदोलनात एकही प्रकल्पग्रस्त सहभागी होणार नाही  


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - धरणग्रस्तांचे प्रश्न शंभर टक्के सुटल्याशिवाय धरणाच्या पाण्याचा एक थेंबही खाली सोडू देणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर खालचे आणि वरचे असा वाद सुरू करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या ' त्या ' नेत्यांच्या जलसमाधी आंदोलनात आमचा एकही प्रकल्पग्रस्त सहभागी होणार नाही असा इशारा वसंतराव मानकुमरे यांचे नाव न घेता देत महू धरणग्रस्तांनी आज धरणाच्या भिंतीवर आपला जाहीर निषेध नोंदवला. 


येत्या तीन तारखेच्या आंदोलनाची गाडी तालुक्यात फिरत असताना धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते एकाकी लढत देत असताना त्यांना पाठिंबा देण्याऐवजी अचानक लाभधारकांचा पुळका घेऊन पाण्यासाठी जलसमाधी आंदोलनाचा एल्गार करणाऱ्या वसंतराव मानकुमरे यांना धरणग्रस्तांनी विरोध दर्शवत घरचा आहेर दिला आहे.

आज सकाळी सर्व धरणग्रस्त या आंदोलनाला विरोध नोंदवण्यासाठी एकत्र जमा झाले आणि आपला जाहीर निषेध नोंदवला

यावेळी बोलताना हरिभाऊ गोळे म्हणाले वसंतराव तुम्हाला आम्ही आमचे नेते समजतो पण तुम्हाला आमच्या भुकेऐवजी लाभधारकांची पडली आहे. त्यामुळे आमचे प्रश्न आम्ही सोडवू तुम्ही शांत बसा.

ज्ञानेश्वर रांजणे म्हणाले १९९६ साली धरणाचा पाया रचला आमचे प्रश्न २९ वर्षानंतर ही कायम आहेत. तुम्ही आंदोलनातून खालचे आणि वरचे असा वाद लाऊन आपली पोळी भाजत आहात. पण आम्ही थेट ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमचे प्रश्न सोडवण्यास पावले उचलली आहेत पण अधिकारी व महसुलच्या कर्मचाऱ्यांनी ते तडीस नेले नाहीत त्यामुळे आमचे प्रश्न सुटतील तुम्ही यात लुडबुड करू नका अशी आमची कळकळीची विनंती आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरण बंद राहील असा इशारा दिला.


रांजणीचे माजी सरपंच संतोष रांजणे यांनी सांगितले अजूनही धरणग्रस्तांचे भूखंड , पुनर्वसन ,पॅकेज असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने नुसत्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांनी आमच्या प्रश्नांसाठी इतके दिवस का आंदोलन केले नाही असा सवाल केला.

गोपाळ बेलोशे म्हणाले , लाभग्रस्थ सुद्धा आमचेच आहेत त्यांना पाणी मिळाले पाहिजे पण बाधितग्रस्ताना प्रथम पाणी द्या त्यांचे प्रश्न सोडवा आणि नंतरच लाभग्रस्ताना पाणी द्या 

विश्वास रांजणे म्हणाले फलटण, खंडाळा या ठिकाणी मिळालेल्या जमिनी जून मालक दमदाटी करून ताब्यात देत नाहीत. ते बाजूला राहिले आणि काही नत्दृष्ट लोक लाभधारकांना पाणी देण्यासाठी आंदोलन करीत आहेत. आपाआपसात वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा जाहिर निषेध. जलसमाधी आंदोलन करण्यासाठी आलेल्या नेत्यांना धरणावर पाय ठेऊ देणार नाही. जर ते येतील त्याची गळ्यात आम्ही दगड बांधून धरणात फेकून देऊ असा इशारा दिला.


सुशील गोळे म्हणाले लाभधारकांसाठी लढणाऱ्या नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी किती आंदोलने केली. आताच पुळका आलेल्या या नेत्यांनी धरणावर फिरकू नये. आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. त्यामुळे आमचे १०० टक्के प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ देणार नाही. 

यावेळी महू धरणग्रस्त संघर्ष कृती समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर रांजणे, उपाध्यक्ष संतोष रांजणे, सदाशिव गोळे,रामदास रांजणे, उत्तम रांजणे, वहागावचे माजी सरपंच हणमंतराव रांजणे, महू सरपंच प्रमोद गोळे , हरिभाऊ गोळे, रमेश रांजणे, सुशील गोळे, बेलोशी सरपंच उमेश बेलोशे, माजी सरपंच चंद्रकांत रांजणे, नथुराम रांजणे, रमेश रांजणे, विश्वास रांजणे, वसंत रांजणे, विलास रांजणे, नामदेव रांजणे, संजीवन रांजणे, प्रकाश रांजणे, शिवराम रांजणे, रांजणी उपसरपंच विठ्ठल रांजणे तसेच अनेक धरणग्रस्त उपस्थित होते. 



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)