केळघर घाटात व्यवसायिक वैमनस्यातून एकावर खुनी हल्ला ; आरोपी फरार
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
बुधवार दि . 11 जून रोजी रात्री 01.30 वा सुमारास मौजे वाटंबे ता . जावली जिल्हा सातारा गावचे हद्दीत सातारा ते महाबळेश्वर जाणारे रस्त्यावर केळघर घाटामध्ये वळणावर आरोपी विनोद तुपे राहणार वडोली भिकेश्वर तालुका कराड जिल्हा सातारा याने त्याच्या सोबत असणाऱ्या साथीदारांसह गाडी अडवून कोयत्याने व दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार सिकंदर इस्माईल मोमीन वय 41 वर्ष व्यवसाय नोकरी (भारतीय सैन्य दल) राहणार .चाफळ तालुका पाटण जिल्हा सातारा सध्या राहणार 109 रामलीला अपार्टमेंट बुधवार पेठ सातारा. यानी मेढा पोलीस स्टेशनला दिली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सिकंदर मोमीन व त्यांचा भाऊ मुसा यास तुला या लाईनला चिकनचा माल टाकू नको असे सांगितले होते तरी तू चिकनचा माल टाकतोय तुला लय मस्ती आहे तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याचा उद्देशाने विनोद तुपे व त्याच्या सोबतचे तीन अनोळखी इसम यांनी कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली म्हणून त्याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार सिकंदर मोमीन यांनी मेढा पोलीस स्टेशनला दिली असून मेढा पोलीस ठाणे गु.र नं 107/2025 BNS 109,115(2),352,351(2)(3) ,3(5) अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील या करत आहेत .