प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे लिपिक अमन खान हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

0

 

मेढा - सेवानिवृत्ती निमित्त अमन खान यांचा सत्कार करताना इकबाल काझी समवेत स्वप्नील बोराटे आदी


प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे लिपिक अमन खान हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त 


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील मेढा शाखेतील लिपिक अमन अब्दूलरहीम खान हे आपल्या ३३वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले .

       त्यानिमित्त बँकेच्या मेढा शाखेत त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी बँकेचे वसुली आधिकारी इकबाल काझी,शाखाप्रमुख रवींद्र जमदाडे,स्वप्नील बोराटे, गणपत धनावडे,अभिजीत शिंगटे,चित्रा शिंदे ,अश्विनी शेलार यांची उपस्थिती होती. यावेळी शाखाप्रमुख रवींद्र जमदाडे म्हणाले, शिक्षक बँकेत अमन खान यांनी ३३वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी त्यांचे वडील आदर्श शिक्षक अब्दुल रहीम खान यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून शिक्षक बँकेत नोकरी केली. प्रामाणिकपणे काम केल्याने त्याचे फळ निश्चित मिळते. अमन खान यांच्या सेवेचा आदर्श कामगार व अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे वसुली आधिकारी इकबाल काझी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते सेवानिवृत्ती निमित्त श्री. खान यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांच्या सहकार्यामुळे आपण शिक्षक बँकेत ३३वर्षे चांगली सेवा करू शकलो असे श्री. खान यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.चित्रा शिंदे यांनी आभार मानले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)