नांदगणे - एस व्ही साळुंखे यांचा सत्कार करताना मारुती दळवी , जगन्नाथ दळवी, ए पी पवेकर , विष्णू दळवी आदि
केळघर , नांदगणे , कुरुळोशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकपदी बदलीने आलेले एस व्ही साळुंखे
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
विविध शासकीय योजना , उपक्रम गावपातळीवर राबवत असताना प्रशासन आणि गाव यामधील समन्वय साधण्याचे काम ग्रामसेवक करत असतात असे प्रतिपादन विस्ताराधिकारी ए पी पवेकर यांनी केले .
नांदगणे ( ता जावली ) येथील ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय बदलीने हजर झालेले ग्रामसेवक एस व्ही साळुंखे यांचे स्वागत करताना ते बोलत होते . यावेळी जि प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विक्रम सावंत, पोलीस पाटील विष्णू दळवी , अंगणवाडी सेविका सुनिता दळवी, आशा सेविका वंदना शिनगारे , माजी सरपंच संजय दळवी , माजी उपसरपंच जगन्नाथ दळवी , महंमद पठाण , रोजगार सेवक गणपत दळवी उपस्थित होते .
यावेळी नव्याने हजर झालेले ग्रामसेवक एस व्ही साळुंखे यांना केळघर , नांदगणे व कुरुळोशी या गावांचा चार्ज देण्यात आला असून यापूर्वी त्यांनी सातारा तालुक्यातील संगम माहुली, बोरखळ याठिकाणी काम केले आहे तर येथील ग्रामसेवक शिवाजी निर्मल यांची पाटण तालुक्यातील राहुडे व निवळे येथे बदली झाली आहे .
यावेळी ग्रामसेवक एस व्ही साळुंखे यांनी सर्वांना सोबत घेऊन प्रशासकीय व विकास कामे केली जातील असे सांगितले . यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते . प्रारंभी संजय दळवी यांनी स्वागत केले .