आदर्श गावं चोरांबे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जावली तालुका विधी सेवा समिती यांच्यावतीने कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न...

0

 

चोरांबे - कायदे विषयक जनजागृती शिबीरात बोलताना  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव  निना नि बेदरकर व जावली तालुका विधी समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश डॉ. विक्रम अं.आव्हाड समवेत इतर मान्यवर


करुयात जागर कायद्याच्या जनजागृतीचा जनसामान्यांच्या मुलभूत हक्कांचा आणि कर्तव्यांचा

आदर्श गावं चोरांबे येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जावली तालुका विधी सेवा समिती यांच्यावतीने कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न...


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
मा. ना. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये शुक्रवार (ता.२७) रोजी कायदे विषयक जनजागृती शिबीर सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मा.श्रीमती निना नि बेदरकर यांचे अध्यक्षतेखाली  व डॉ. विक्रम आव्हाड, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांच्या प्रमुख उपस्थितीत कायदे विषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले.

       यावेळी झालेल्या कार्यक्रमास जावली तालुक्याचे तहसीलदार हणमंत कोळेकर, सहा.गटविकास अधिकारी जावली राम जगताप, सहा विधी लोक अभिरक्षक ॲड.यश गोडखिंडी, चोरांबे गावचे सरपंच  विजय सपकाळ, तालुका वकील संघाचे अध्यक्ष  आर एस पोफळे , मेढा न्यायालयातील सहा. सरकारी अभियोक्त श्रीमती जे आर इंगळे , ॲड. पी. डी गोरे, ॲड. एन. एस. पवार, ॲड. अनुप लकडे, ॲड आरती के शेटे व तसेच चोरांबे गावचे नागरिक, पोलिस पाटील, आशा सेविका , बचतगट, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, तलाठी न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

       सदर जनजागृती कार्यक्रमात कायदे विषयक जनजागृती शिबीर घेण्यामागील उद्देश काय आहे. तसेच जनसामान्यांना आपल्या मूलभूत हक्काचे संरक्षण कसे करावे , कायद्याने ठरवून दिलेले आपले हक्क व मूलभूत कर्तव्य कोणते आहेत, त्याचे असणारे फायदे व लाभ तसेच सार्वजनिक उपयोगिता सेवा व महाराष्ट्र राज्यातील ऊस तोड कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना, प्रदूषण मुक्त हवा व पाणी, अन्नाचा अधिकार, मूलभूत कर्तव्य व  वैकल्पीक वाद निवारण पद्धत या विषयी सखोल कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी न्यायालयाचे कर्मचारी संदीप मोरे, अवधूत कुलकर्णी, प्रशांत लिंगडे, महेश पवार, रवींद्र करंजेकर, काजल ओंबळे , मनोज कांबळे, राजेश काळंगे , विजय कदम, कोंडीबा शिंदे,  सुमित ढवळे, आकाश साबळे, आप्पा आवटे, बाबा बढेकर सागर मोरे , जयेश केंजळे या सर्वांनी विशेष योगदान दिले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)