मेढा - जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रमात बोलताना डॉ.विक्रम अं.आव्हाड समवेत डॉ. अशोक गिरी , डॉ. प्रमोद घाटगे, अश्विनी पाटील इतर मान्यवर
अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी – एक गंभीर सामाजिक प्रश्न
ज्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घ्यायची होती,
ते व्यसनाच्या गर्तेत हरवले गेले... - डॉ. विक्रम आव्हाड
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी हा एक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होत असून ज्यांच्या स्वप्नांना उंच भरारी घ्यायची होती, ते व्यसनाच्या गर्तेत हरवले गेले . अशा भावी पिढीला अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्याकरता जनजागृती करणे आवश्यक आहे .असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा डॉ. विक्रम आव्हाड यांनी केले .
मा. ना. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये गुरूवार (ता.२६) रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा डॉ. विक्रम आव्हाड, यांचे अध्यक्षतेखाली साजरा करणेत आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी , डॉ. प्रमोद घाटगे , सहा. पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर एस पोफळे , ॲड. पी. डी गोरे, ॲड. एन. एस. पवार, ॲड. अनुप लकडे व तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व इतर प्राध्यापक, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
सदर जनजागृती कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यामागील उद्देश काय आहे. तसेच भारतात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार (नार्कोटिक ड्रग्ज ॲन्ड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ॲक्ट-१९८५) नशीले पदार्थ वापरणे, बाळगणे, साठवणे, वाहतूक करणे तसेच सेवन करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ड्रग्ज तुम्ही तुमच्यासाठी वापरा किंवा दुसऱ्या कामासाठी वापरला तर तो देखील गुन्हाच आहे. त्याला दंड हा ड्रग्स किती प्रमाणात वापरतो याच्यावर अवलंबून असते. जर एखाद्याला ड्रग्स बाळगण्यासाठी किंवा सेवन केल्यामुळे शिक्षा झाली असेल आणि त्याची सुधारायची इच्छा असेल तर तो एखाद्या डी-ॲडिक्शन सेंटरमध्ये उपचार घेऊ शकतो. त्याने उपचार मध्येच थांबवले आणि परत व्यसनाकडे वळाला तर त्याला परत शिक्षा होऊ शकते. याबाबत उपस्थितांना समजावून सांगण्यात आल्या. भावी पिढीला अंमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्याकरता जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन २०२५ वर्षाची थीम " ब्रेकिंग द चेन्स: प्रिव्हेन्शन, ट्रीटमेंट आणि रिकव्हरी फॉर ऑल अशी आहे. अंमली पदार्थ म्हणजे हे एक प्रकारचे औषध आहे जे वेदना किंवा झोप कमी करण्यास किंवा प्रवृत्त करण्यास मदत करते तर ते मूड आणि वागणूक देखील बदलते. जेव्हा ते इतके घेतले जाते तेव्हा ते व्यसनाधीन देखील असू शकते. या कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यास मार्गदर्शनपर भाषण केले .
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य व उपप्राचार्य , सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्माचारी तसेच मेढा न्यायालयाचे कर्मचारी संदीप मोरे, अवधूत कुलकर्णी, प्रशांत लिंगडे, महेश पवार, रवींद्र करंजेकर, काजल ओंबळे , मनोज कांबळे, विजय कदम, कोंडीबा शिंदे, सुमित ढवळे, आकाश साबळे या सर्वांनी विशेष योगदान दिले.