श्रींमत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.७ रोजी वसंतगडावर भव्य सांप्रदायिक महामेळाव्याचे आयोजन - वसंतराव मानकुमरे

0

 श्रींमत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.७ रोजी वसंतगडावर भव्य सांप्रदायिक महामेळाव्याचे आयोजन - वसंतराव मानकुमरे


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

 सातारा - जावली विधानसभा निवडणुक ही यावेळी अभुतपूर्व अशी होणार असून भाजपा महायुतीचे उमेदवार आ . श्रींमत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्यात नंबर एकचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्व जाती धर्माचे, संघटनांची जनता एकवटी आहे . त्यांनी कोटयावधीची विकास केली आहेत . त्यांना पाठींबा देण्यासाठी तसेच नुतन खा. श्री. छ. उदयनराजे भासले व खा. नितीनकाका पाटील यांचा नागरी सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी जि.प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिली. यावेळी मेढा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्ता आण्णा पवार हे उपस्थित होते .

      

       मेढा (वसंतगड ) येथे भाजपा महायुतीचे उमेदवार आ . श्रींमत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि.७ रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य अशा सांप्रदायिक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या महामेळाव्यामध्ये तालुक्यातील भाजपा,शिवसेना (शिंदे गट) , राष्ट्रवादी ( अजित पवार गट ), आठवले गट आदी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यामध्ये लोकसभेच्या निवडणूकीमध्ये निवडून आलेले खा. श्री छ. उदयनराजे भोसले आणि खा. नितीनकाका पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून सांप्रदायिक क्षेत्रात काम करणारे सुहास गिरी हे सांप्रदायिक वारकऱ्यासह महायुतीचे उमेदवार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पाठींबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहे.लोकसभेला शशिकांत शिंदे बरोबर असणारे सुहास गिरीं बाबत बोलताना वसंतराव मानकुमरे म्हणाले छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना दोन वेळा संधी देवुन पती पत्नीला सभापती बनविले होते. ते कायम बाबांच्या बरोबरच होते व आहेत. लोकसभेला शशिकांत शिंदे व त्यांचे कौंटुंबिक संबंध असल्याने त्यांना त्यावेळी सहकार्य करण्याची परवानगी दिली होती असे यावेळी वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले. यावेळी सुहास गिरी यांच्यासह अनेक मान्यवरांचा पक्ष प्रवेश होणार आहे . त्यामुळे तालुक्यात भाजपाची ताकद वाढली आहे . असे मानकुंमरे यांनी यावेळी सांगितले .

       आ . श्रींमत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संपूर्ण तालुक्यात विकासाचे जाळे पसरवून विरोधकांनाही आपलेसे केले आहे . त्यामुळे तालुक्यात आता विरोधक शिल्लक राहिले नसून जे कोणी नाराज आहेत त्यांची समजूत काढली जाईल आणि आ श्रींमत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सर्वाधिक्य मताधिक्य देण्यासाठी भाजपा व महायुतीचे घटक पक्ष जोरदार प्रचार यंत्रणा राबवत असून तालुक्यातील मेढा , केळघर , सावली ,केंडबे , कुडाळ , करहर विभागातील गावा -गावात प्रचार दौरा करण्यात आला यावेळी गावा गावात उस्फूर्त स्वागत करण्यात आले .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)