दापवडी : व्यायाम शाळेचे उद्घाटन करताना किसनराव जाधव शेजारी इतर मान्यवर
दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयात अध्यावत व्यायाम शाळेचे उद्घाटन
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
जिल्हा क्रीडा संचालनलयाच्यावतीने तळदेव येथील कोयना एज्युकेशन संस्थेच्या दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील अध्यावत व्यायाम शाळेचा उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष किसनराव जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मारुती फळणे गुरुजी , डी. के. जाधव, धोंडीराम जंगम, बी.व्ही. शेलार, अजित आपटे, टी. के. बाबर, दापवडी सरपंच महादेव रांजणे, माजी सरपंच संतोष रांजणे, सदाशिव रांजणे, रविकांत बेलोशे, मुख्याध्यापक पुंडलिक कांबळे व इतर उपस्थित होते.
शालेय शिक्षण घेताना युवकांनी विनाशाचा नाश करावा यासाठी सदृढ होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे बलसागर भारत होवो या गीताप्रमाने बलवान व सुदृढ पिढी घडवण्यासाठी व्यायाम शाळा उपयोगी पडणार असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना डी. के. जाधव यांनी केले.
सध्या समाजात महिलांनाही अन्याय अत्याचार होईल त्यावेळी प्रत्युत्तर करण्यासाठी आरोग्य निरोगी आणि सदृढ असण्याबरोबरच बलदंड शरीरयष्टी असणे गरजेचे आहे. व्यायाम शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यायामा बरोबरच आसने करावीत व या सेवेचा उपयोग करून घ्यावा असेही यावेळी जाधव यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमास नथुराम रांजणे, काळू पाटील , संतोष रांजणे, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक पुंडलिक कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन घाडगे यांनी केले तर आभार आर. एस. बुरूंगले यांनी मानले.