जावलीकरांचे माझ्यावर भर भरून प्रेम आहे . त्यांना देताना मी कधीही हात आखडता घेणार नाही ; बोंडारवाडी धरणासाठी सर्वतोपरी सहकार्य -ना शिवेंद्रसिंहराजे भोसले

0

 


केळघर - शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना  ना . शिवेंद्रसिंहराजे भोसले शेजारी हणमंत कोळेकर , बापूराव पार्टे ,राजेंद्र मोकाशी ,ज्ञानदेव रांजणे , एकनाथ ओंबळे , आदिनाथ ओंबळे , विलासबाबा जवळ ,  राजेंद्र धनावडे , आनंदराव जुनघरे , मोहनराव कासुर्डे , सागर धनावडे आदि

जावलीकरांचे माझ्यावर भर भरून प्रेम आहे . त्यांना देताना मी कधीही हात आखडता घेणार  नाही ;
बोंडारवाडी धरणासाठी सर्वतोपरी सहकार्य - ना शिवेंद्रसिंहराजे भोसले

केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -


जावली तालुक्यातील जनतेने माझ्यावर भर भरून प्रेम केले आहे त्यामुळे त्यांना देताना मी कधीही हात आखडता घेणार नाही .बोंडारवाडी धरणासाठी मुख्यमंत्री ना . देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला असून बाधितांचे योग्य समन्वयाने पुनर्वसन करत ५४ गावांचा पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली .
      स्वामी समर्थ मंगल कार्यालय नांदगणे - केळघर ( ता जावली ) येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने आयोजित   ना . भोसले  व सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांचा सेवानिवृत्ती निमित नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी माजी आ सदाशिव सपकाळ , तहसिलदार हणमंत कोळेकर , इतिहासकार श्रीमंत कोकाटे , माजी सभापती बापूराव पार्टे , जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे , माजी सभापती भाऊसाहेब उभे , शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे , कृती समितीचे आदिनाथ ओंबळे , विलासबाबा जवळ , युवा उद्योजक राजेंद्र धनावडे , आनंदराव जुनघरे , मोहनराव कासुर्डे ,भायुमोचे तालुकाध्यक्ष सागर धनावडे , केळघर विकास सोसायटीचे चेअरमन सुनिल जांभळे,आनंदराव सपकाळ ,विजय शेलार , नारायण धनावडे , एकनाथ सपकाळ , ज्ञानेश्वर दळवी , हरिभाऊ शेलार , विजय सावले , विनोद शिंगटे , रामभाऊ शेलार , नारायण सुर्वे , जगन्नाथ जाधव , वैभव ओंबळे , जनार्दन मोरे , राजेंद्र जाधव , जगन्नाथ पार्टे ,जितेंद्र कासुर्डे , अंकुश बेलोशे आदिंची प्रमुख उपस्थिती होती .
      यावेळी ना भोसले म्हणाले , या विभागातील जनतेच्या पाणी टंचाईचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी विजयराव मोकाशी साहेब यांनी बोंडारवाडी धरण कृती समितीच्या माध्यमातून उभ्या केलेल्या लढ्याला मुहर्त स्वरूप येत आहे . ते आज जरी आपल्यात नसले तरी विचाराने ते कायम आपल्या सोबत असतील . त्यांची स्वप्न पूर्ती करण्यासाठी ,त्यांच्या विचारांना तसेच बोंडारवाडी धरणास माझा कायम पाठींबा असून  बाधित होणाऱ्या गावांचे योग्य पुनर्वसन करून एक टीएमसी धरण होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करणार असे सांगून ना भोसले पुढे म्हणाले , ऐतिहासिक जावलीचे छत्रपतीच्यां घराण्याशी असणारे रुनानुबंध आजही कायम असून मला मिळालेले मताधिक्य हे माझ्या कामाची पोहचपावती आहे . मी कायम जनतेच्या रुनामध्ये राहत काम करणार .
    यावेळी माजी मा सदाशिव सपकाळ म्हणाले , तालुक्याच्या विकासासाठी राजकारणापलिकडे जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे . बोंडारवाडी धरणासाठी ना भोसले यांनी विस्थापितांचे योग्य पुनर्वसन करुन धरणांस गती द्यावी . आम्ही सर्वजण सहकार्य करू .
    यावेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे म्हणाले , इतिहासातील शिवाजी महाराजांचा दाखला देत , शिवेंद्रसिंहराजेंनी तो वारसा जपला असून ते दिलेला शब्द नेहमी पाळतात . त्यांचे तत्वानिष्ठ व्यक्तीमत्व महाराष्ट्रात लोकप्रिय आहे . त्यांच्या माध्यमातून या विभागातील जनतेचे प्रश्न कायम स्वरूपी सुटतील .
   यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी म्हणाले , या परिसरातील जनता पाण्याअभावी रोजी - रोटीसाठी विस्थापित होत आहे . हे थांबविण्यासाठी बोंडारवाडी धरण होणे ही गरज आहे . आणि ना भोसले हेच फक्त हे काम करू शकतात .
   यावेळी एकनाथ सपकाळ , विलासबाबा जवळ , वैभव ओंबळे , राजेंद्र जाधव आदिंची भाषणे झाली . प्रारंभी प्रास्ताविक आदिनाथ आंबळे यांनी केले . सूत्रसंचालन अशोक लकडे यांनी केले तर आभार श्रीरंग बैलकर यांनी मानले .
    कार्यक्रमास केळघर , मेढा , कुसुंबी परिसरातील ५४ गावातील सरपंच , उपसरपंच , विविध संस्थांचे पदाधिकारी , ग्रामस्थ , महिला , मुंबई - पुणे स्थित युवक उपस्थित होते .



       सध्या कोयना धरणातर्गंत असणाऱ्या तापोळा विभागातील सोळशी नदीवर धरण बांधण्यासाठी सव्हे सुरु असून याचे पाणी भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून जावली तालुक्यातील बामणोली विभागापर्यंत कॅनॉल व्हावा तसेच केळघर विभागातील काही गावांना बोगद्याव्दारे पाणी मिळावे यासाठी सर्व्हे व्हावा . अशी मागणी केली आहे . मात्र याचा बोंडारवाडी धरणावर कोणताही परिणाम होणार नाही . तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये . असे ना भोसले यांनी सांगितले .
       बोंडारवाडी धरण कृती समितीला वेळोवेळी लागणाऱ्या खर्चासाठी पाण्याचे महत्व कळलेल्या महिलांनी सढळ हाताने निधी जमवला असून यावेळी पुणे स्थित जावलीकरांनी अकरा हजार तर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत कृती समितीला अकरा हजार रुपयाची देणगी दिली .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)