शेतीविषयक विविध योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या ऍग्रीस्टॅक योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा . - उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल

0

 


वरोशी - ऍग्री स्टॅक योजनेच्या कॅम्पमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना आशिष बारकुल. समवेत हणमंत कोळेकर, संजय बैलकर,संदीप ढाकणे, विलास शिर्के आदी


शेतीविषयक विविध योजनांसाठी आवश्यक असणाऱ्या ऍग्रीस्टॅक योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा  - उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल


केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

 केंद्र शासनाच्यावतीने ऍग्रीस्टॅक ही योजना महसूल, कृषी,ग्रामविकास विभागाच्या मदतीने राबविण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार केले जाणार असून त्यात शेतकऱ्यांचे नाव, त्यांच्या जमिनीची माहिती, व आधार क्रमांक जोडला जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या व त्यांच्याकडे असलेली जमीन याची माहिती मिळणार आहे.शेतकरी ओळख प्रमाणपत्र या योजनेमुळे शेतकऱ्यांची सर्व माहिती एकत्रितपणे संकलित केली जाणार असून शेतीविषयक विविध योजनांसाठी हे ओळखपत्र आवश्यक असून जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्रात आपले शेतकरी ओळख प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल यांनी केले.

वरोशी येथे ऍग्रिस्टॅक योजनेच्या कॅम्पला उपविभागीय अधिकारी बारकुल यांनी नुकतीच भेट दिली.त्यावेळी शेतकऱ्यांशी व ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर,नायब तहसीलदार संजय बैलकर, तलाठी संदीप ढाकणे ,वरोशीचे सरपंच विलास शिर्के, उपसरपंच संदीप कासुर्डे,सुरेश कासुर्डे, बाजीराव कासुर्डे, शांताराम कासुर्डे, अंकुश कासुर्डे, केशव कासुर्डे, संपत कासुर्डे, राजेंद्र गहीणे, संतोष कासुर्डे, संदीप मो. कासुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

     उपविभागीय अधिकारी बारकुल म्हणाले, शेतकरी ओळखपत्र योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार असून शेतकऱ्यांची एकत्रित माहिती संकलित होणार आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी नागरी सेवा केंद्रात आपला फॉर्म भरून शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे. तहसीलदार कोळेकर यांनी यावेळी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी व ग्रामस्थांना दिली. उपविभागीय अधिकारी बारकुल यांनी वरोशी येथे ऍग्रिस्टॅक कॅम्पला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. संतोष कासुर्डे यांनी स्वागत करून आभार मानले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)