महाराष्ट्र बँकेचे मेढा शाखाधिकारी नरेश सोळंकी यांचा सत्कार करताना तुकाराम धनावडे , सुरेश पार्टे, बाळसाहेब पंडित,यांच्यासह बँकेचे खातेदार व कर्मचारी
जावळीतील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य - नरेश सोळंकी
मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
बँक ऑफ महाराष्ट्र मेढा शाखा व्यवसायामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आघाडीवर असून ती नेहमीच आघाडीवर राहील. बँकेच्या व्यवसाय वृध्दी बरोबरच , खातेदार , ठेवीदार यांना उत्तमोत्तम सेवा पुरवणे. व्यवसाय , शैक्षणिक , घरबांधणी, व अन्य कारणासाठी त्वरीत अर्थ पुरवठा करण्याचे काम निश्चित होईल. या तालुक्यातील जनता प्रेमळ व गरीब आहे. त्यांची बँकेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्यच समजतो .असे मेढा शाखेचे शाखा अधिकारी नरेश सोळंकी यांनी सुचित केले.
बँक ऑफ महाराष्ट्र मेढा शाखेचे शाखाधिकारी म्हणून नव्याने हजर झालेले नरेश सोळंकी यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन जेष्ठ नेते तुकाराम धनावडे यांचे नेतृत्वाखाली , बँकेचे खातेदार , ठेवीदार, हितचिंतक , व कर्मचारी वर्ग यांच्यावतीने करण्यात आले होते . त्या प्रसंगी श्री. सोळंकी बोलत होते. ते पूढे म्हणाले, बँकेच्या कामकाजाबाबत काही सुचना असतील , काही तक्रारी असतील त्या खातेदार , ठेवीदार यांनी निशंकोच पणे मला सांगाव्यात असेही सुचित केले.
या प्रसंगी जेष्ठ नेते , तुकाराम धनावडे यांनी . श्री. सोळंकी यांचा परिचय करून देवून उपस्थीत सर्वांच्यावतीने त्यांचे स्वागत केले.बॅंकेच्या ठेवीदार , खोतदार , कर्जदार यांना उत्तमोत्तम सेवा आपल्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी वेण्णामाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे, सामाजिक कार्यकर्ते बाळसाहेब पंडित, उषा उंबरकर, पांडुरंग जुनघरे, किसन ओंबळे, तुकाराम घाडगे, तुकाराम साळुंखे, यांच्यासह बँक कर्मचारी सानिका औंधे, ज्योती भोईर, शैलेश गायकवाड, नितीन लोहार, अश्विनी गाडवे, सुवर्णा बेलोशे यांच्यासह बँकेचे खातेदार, सभासद, ठेवीदार उपस्थीत होते.