संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनांच्या लाभाची रक्कम आता थेट लाभार्थी यांच्या खात्यावर
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -
संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ राज्य निवृत्ती योजना या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असून जावली-मेढा तालुक्यातील या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे गावचे तलाठी, कोतवाल यांचेकडे ३० जून अखेर जमा करावीत असे आवाहन तहसीलदार जावली, हणमंत कोळेकर यांनी केले आहे.
जावली तालुक्यात एकूण संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन या पुढील काळात संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना लाभाची रक्कम आता लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. याकरिता लाभार्थ्यांची माहिती अद्यावत असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली आवश्यक माहिती तलाठी व कोतवाल यांचेकडे जमा करावी. तहसीलदार जावली, हणमंत कोळेकर यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले असून सदर योजनेचे 2784 लाभार्थी असून त्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. यापुढील काळात ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर डीबीटीद्वारे म्हणजेच थेट खात्यावर जमा होतात, त्याप्रमाणे यापुढील काळात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या लाभाची रकम देखील थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असून शासनाकडून तसे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ घेताना यापुढील काळात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी लाभार्थ्यांनी जन्मतारीख, मोबाईल नंबर, बैंक खात्याचे पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी त्याच्या दिव्यांगाचा प्रकार व टक्केवारी सर्टिफिकेट आदी बाबतची छायांकित कागदपत्रे गावचे तलाठी अथवा कोतवाल यांच्याकडे ३० जून अखेर जमा करावी. जेणेकरून लाभार्थ्यांना लाभ घेताना अडचणी येणार नाहीत, असे नमूद करून सजय गांधी योजनेचे लाभार्थी नोंदणी व अध्यायवतीकरण यापासून वंचित राहू नये, यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील यांनी देखील पुढाकार घ्यावा. असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे .