केदारनाथ (उत्तराखंड) - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावे म्हणून केदारनाथला साकडे घालताना सुनील जांभळे ,समवेत दीपक शेलार, सचिन पार्टे, सतीश पार्टे, अक्षय चिकने, अनिल बेलोशे व युवक
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी जावलीतील कार्यकर्त्यांच्यावतीने केदारनाथला साकडे
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा ) -
सध्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या मंत्रिमंडळ विस्तारत सातारा-जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपद मिळण्याची संधी आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावे म्हणून केळघर विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुनिल (नाना) जांभळे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे केळघर विभागातील समर्थक यांचे वतीने उत्तराखंड येथील येथील श्री. केदारनाथ बाबांना साकड घालण्यात आले.१२ज्योतिर्लिंग मधील एक प्रसिद्ध व अत्यंत दुर्गम असलेल्या केदारनाथ बाबाला यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांना मंत्रिपद मिळावे अशी प्रार्थना केली.यावेळी दिपक शेलार ,सचिन पार्टे (हॉटेल समृद्धी ) सतिश पार्टे अक्षय चिकणे अनिल बेलोशे इ. युवक उपस्थित होते .आमदार भोसले यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सातारा जिल्ह्यातून संधी मिळाली पाहिजे,अशी मागणी सर्वात आधी सकाळने केली होती. आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावे म्हणून त्यांच्या समर्थकांनी थेट बाबा केदारनाथ ना साकडे घातले असून या विस्तारात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना लाल दिवा देऊन भाजपने त्यांच्या एकनिष्ठतेचा सन्मान करावा अशी आग्रही मागणी सातारा-जावळी तील बाबाराजे समर्थक करत आहेत.