ग्रामीण भागात समर्पित भावनेने ग्रंथालये चालवली जातात. म. गांधी वाचनालयास जिल्हा आदर्श ग्रंथालय पुरस्कार

0


 म. गांधी वाचनालयास आदर्श जिल्हा ग्रंथालय पुरस्कार वितरण करताना विजयकुमार क्षीरसागर, अश्वमेध ग्रंथालयाचे पदाधिकारी व मान्यवर


ग्रामीण भागात समर्पित भावनेने ग्रंथालये चालवली जातात.

म. गांधी वाचनालयास जिल्हा आदर्श ग्रंथालय पुरस्कार


मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

    

ग्रामीण भागात ग्रंथालयांची स्थिती आणि असणारे मानधन अल्प असले तरी समर्पित भावाने ग्रंथालये चालवली जातात या समर्पण भावाचे कौतुक करून ही वाचन संस्कृती पुढे चालवण्याचा प्रयत्न अश्वमेध ग्रंथालय करत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे असे मत प्रसिद्ध सीए विजयकुमार क्षीरसागर यांनी व्यक्त केले .


     अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय तर्फे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांचे स्मृत्यर्थ उत्कृष्ट ग्रंथालय  , उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी व कार्यकर्ता आणि त्याचबरोबर उत्कृष्ट ग्रंथवाचक या पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध सीए श्री विजयकुमार क्षीरसागर यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आले . त्या प्रसंगी श्री. क्षीरसागर बोलत होते.

        प्रारंभी उत्कृष्ट ग्रंथवाचक पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांना  ,  उत्कृष्ट ग्रंथालयाचा पुरस्कार महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा ,तालुका जावळी यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार डॉक्टर सौ ज्योत्स्ना कोल्हटकर यांना तर उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार ज्योतीराम जाधव मेंढोशी तालुका पाटण यांना प्रदान करण्यात आला .

यावेळी  संस्थापक डॉक्टर रवींद्र भारती  ,कार्याध्यक्ष डॉक्टर राजेंद्र माने अध्यक्ष श्री शशी भूषण जाधव उपाध्यक्ष दत्तात्रय मोहिते उपस्थित होते .

        याप्रसंगी किशोर बेडकिहाळ यांनी त्यांच्या मनोगतात रंजक वाचनापासून वाचनाची बैठक तयार होते आणि तिथून वयानुसार हा प्रवास प्रगल्भ वाचनाकडे जातो .माणसाने सतत वाचत राहिले पाहिजे म्हणजे एक वैचारिक समृद्धी निर्माण होते . सर्व प्रकारचे वाचन त्यासाठी महत्त्वाचे असते असे मत व्यक्त केले .

सुरेश पार्टे यांनी मेढा येथिल ग्रंथालयांचे उपक्रमा बद्दल माहिती दिली व अश्वमेध ग्रंथालयाला धन्यवाद दिले .

डॉक्टर रवींद्र भारती यांनी प्रास्ताविक करताना अश्वमेध ग्रंथालयाच्या उपक्रमांच्या विषयी माहिती दिली  .अनुदान नसताना सुद्धा अश्वमेध ग्रंथालय इतर ग्रंथालयांना गौरवण्याचा प्रयत्न करते त्यामागे वाचन संस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न असतो असे मत व्यक्त केले .

साहित्यिक डॉ राजेंद्र माने यांनी या पुरस्कारा मागे ग्रंथालयांना बळ मिळावे आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त कृतीशील व्हावे हीच भूमिका आहे असे मत व्यक्त केले .

यावेळी डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी मिळालेल्या गौरवा बद्दल अश्वमेध ग्रंथालयाचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर संजय इंगवले यांनीही मेंढोशी सारख्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याचा सत्कार अश्वमेध ग्रंथालयाने केला म्हणून धन्यवाद दिले .

  याच कार्यक्रमात अश्वमेध ग्रंथालयातर्फे गुंफण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने व अमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनात निमंत्रक कवी म्हणून निवड झाल्याबद्दल प्रदीप कांबळे यांचा सत्कार बाबुराव शिंदे व प्रा श्रीधर साळुंखे यांचे हस्ते करण्यात आला .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कदम यांनी केले आभार प्रदीप कांबळे यांनी मानले .

कार्यक्रमास श्रीधर साळुंखे,सुरेश पार्टे, डॉक्टर श्याम बडवे अशोक काळे डॉक्टर अदिती काळमेख ,कांता भोसले, आनंदा ननावरे ,गौतम भोसले, सागर गायकवाड, मदन देशपांडे, केदार खैर ,निलेश पवार ,पोपटराव मोरे , शुभम् तंटक , नारायण शिंगटे , धनंजय पवार , रघुनाथ जवळ , अशोक दिक्षीत शशीकांत कदम ,यांच्यासह . पुरस्कार प्राप्त ग्रंथालयांचे पदाधिकारी , संचालक , कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते .

   

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)