मेढा नगरपंचायतीच्या करवाढी संदर्भात मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना निवेदन

0

 


मेढा नगरपंचायतीच्या अन्यायी चतुर्थ करवाढी संदर्भात मुख्यमंत्री ना .एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना निवेदन देताना अमितदादा कदम व शिष्टमंडळ


मेढा नगरपंचायतीच्या करवाढी संदर्भात 

मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना निवेदन

 मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -

     मेढा नगरपंचायतीच्या अन्यायी चतुर्थ करवाढ आकारणी बाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री ना . अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले.

    रहिवाशी शेतकरी बचाव संघ मेढा यांचे वतीने राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, व उपमुख्यमंत्री ना . अजितदादा कदम यांना भेटून शिष्ट मंडळाचे वतीने निवेदन दे०यात आले. या प्रसंगी वे०णामाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे , राष्ट्रवादीचे सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रविंद्र शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे , अशोक गोळे, प्रकाश कदम , अरूण जवळ , संजय सपकाळ, आनंदा कांबळे , संदीप पवार , महेश कदम , सोमनाथ कदम, महेश पाटील , आदित्य जगताप , सागर पवार  इत्यादी उपस्थित होते. 

       मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाच्या माहितीनुसार मेढा हे जावली तालुक्याचे मुख्यालय असल्याने शासन निर्णयानुसार दिनांक 24 /5 /2 016 रोजी मेढा ग्रामपंचायतीची  नगरपंचायत झाली.  भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्येचा निकष बघता नगरपंचायती येथील नागरिकांच्या वर लादली आहे. दिनांक 9 जून 2022 ला बॉडीची मुदत संपली आणि त्यानंतर आलेल्या प्रशासकांनी अवाजवी चतुर्थकर आकारणी बरोबरच विकास आराखडा येथील जनतेवर लादला आहे .कर आकारणी मध्ये अनेक तोटे आहेत .त्या दुरुस्त करण्यात याव्यात तसेच दिनांक 20 /2 /2023 रोजीच्या नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडून मेढा  नगरपंचायतीला  पाठवण्यात आलेल्या आदेशानुसार  पुढील आदेश येईपर्यंत नगरपंचायतीने सुरू केलेला कर मूल्याधिकरण प्रक्रियेस चालू असलेल्या टप्प्यावर स्थगित देण्यात येत आहे. असे संबधीत  विभागाने  लेखी कळवूनही  नगरपंचायतीने चतुर्थकर आकारणी बरोबरच मागील दोन वर्षाच्या फरकासह कर मागणी नोटीस मिळकत धारकांना दिली  आहेत. वास्तविक जून 2023 मध्ये जुन्या दरानेच बिले देण्यात आली होती मात्र पुन्हा डिसेंबर मध्ये वाढीव दराने दिले देण्यात आली आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या कारभाराबाबत नागरिकांच्या मनात संधीगता  निर्माण झाली आहे .अद्याप विकास आराखडा मंजूर नाही .नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा देण्यास नगरपंचायत असमर्थ आहे .बांधकामासाठी परवानग्या  मिळत नाहीत .अद्याप सातबारा सुरू महसूल विभागाचाही महसूल भरावा लागत आहे .दिनांक 9 जून 2022 ला पहिल्या नगरसेवक बॉडीची मुदत संपली असून अध्याप नवीन बॉडी अस्तित्वात नाही .त्यामुळे चतुर्थकर आकारणीची प्रक्रिया स्थगित करून जुन्यादाराप्रमाणे कराची रक्कम नगरपंचायतीने स्वीकारावी .नवीन बॉडी अस्तित्वात आल्यानंतर व शासन निर्णयानुसार व नगरसेवक बॉडीच्या निर्णयानुसार जी कमी जास्त रक्कम होईल ती  रक्कम भरण्यास मेढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मिळकत धारक बंधनकारक आहेत. असे या निवेदनात नमूद करून आले आहे.



  

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)