जावली तालुक्यात मोटार केबलच्या भुरट्या चोरीचा सुळसुळाट : शेतकरीवर्ग त्रस्त, धार्मिक कलशाची होतेय खुलेआम विक्री

0

 


जावली तालुक्यात मोटार केबलच्या भुरट्या चोरीचा सुळसुळाट : शेतकरीवर्ग त्रस्त, धार्मिक कलशाची होतेय खुलेआम विक्री


तालुक्यातील भंगार दुकाने बंद करण्याची तीव्र मागणी


कुडाळ : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -


कुडाळ व करहर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची सद्या शेती मशागत व शेती भिझवण्याची कामे सुरू आहेत.त्यातच सध्या धोम उजव्या कॅनलला पाणी आले असल्याने शेतकरी पोट पाठ तसेच आपल्या मोटारीच्या साह्याने शेतजमीन भिजवत आहेत.परंतु अलीकडच्या काही दिवसांपासून कुडाळ व करहर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल मोठ्या प्रमाणात चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.मोटरी व केबल चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. या चोरीबाबत शेतकऱ्यांनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.परिसरातील भंगार दुकानात हे चोरीचे साहित्य खुल्याआम खरेदी केले जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन दुकाने बंद करण्यात यावीत.अशी शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र मागणी केली आहे.

         गेल्या काही महिन्यात तसेच नुकतेच आठ ते दहा दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीकडून कुडाळ येथील असणारा जुना कचरा डेपो येथे मोटर केबल सदृश्य वस्तू आणून त्या कचऱ्याच्या डिगामध्ये पेटवण्यात येत असल्याचे काही शेतकरी व नागरिकांना दिसून आले.याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना अनोळखी व्यक्ती कडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली.त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावर संशय निर्माण झाला.अश्या भुरट्या चोरीतून मोठ्या प्रमाणात केबल चोरीचे प्रमाण जावली तालुक्यातील ठीक-ठिकाणी भागात वाढले आहे असे असताना चिरीमिरी चोरीसाठी शेतकऱ्यांच्या केबल मोटारी चोरून मुद्देमाल भंगार दुकान वाल्यांना विकला जात आहे.प्रशासन निपक्षपतीपणे चोरीचा तपास लावणार असल्यास आम्ही आमच्याकडे असणारे व्हिडिओ व फोटो प्रशासनाला देऊन सहकार्य करू. असे मत शेतकऱ्यांनी वक्त केले आहे.

     कुडाळ भागात असणाऱ्या काही भंगार दुकानांमध्ये धार्मिक विधीसाठी वापरण्यात येणारा तांब्याचा कलशही  विकत घेतला जात असल्याचे चित्र मोबाईल कॅमेराद्वारे टिपले गेले आहे.चोरट्यांकडून रात्री-अप रात्री  आडोशाचा फायदा घेऊन चोरीचा मुद्देमाल आणून तो पेटवला जात आहे. त्यामुळे त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना व नागरिकांना सहन करावा लगत आहे.धार्मिक कलश व शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे प्रमाण वाढले तर याला जबाबदार कोण राहणार? यात होणारे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान कोण थांबवणार? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.



जावली तालुक्यातील कित्येक तरी गावातील आजपर्यंत चोरट्यांकडून मोटार, विद्युत केबल,तसेच विविध चोरीच्या वस्तू लक्ष करण्यात आल्या आहेत.या वेगवेगळया घटनेबाबत वारंवार शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु पोलीस प्रशासनाने आज पर्यंत या घडलेल्या घटनांची दखल गांभीर्याने घेतली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.चोरट्यांचा योग्य वेळी बंदोबस्त न केल्यामुळे तालुक्यातील विविध ठिकाणाहून मोठमोठे ट्रान्सफर चोरी करण्यापर्यंत या चोरट्यांची मजल गेली आहे.

- विरेंद्र शिंदे, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य 


 निसर्गाचा बेभरवसा,पिकाला हमी भाव नाही,मजुरी दराचा कहर ह्याने आधीच शेतकरी त्रस्त आहे. त्यातच मोटार व वायर चोरीचे प्रमाण वाढत आहे.हे सगळं असहनिय आहे.हया वेशीवरच्या चोरांचा प्रतीबंध पोलीस प्रशासनाकडून केला गेला पाहिजे.तसेच या भंगार दुकानदारांना नक्की आश्रय कोणाचा आणि भंगार व्यवसाय अधीकृत आहेत का?


हेमंत शिंदे (उपसभापती) 

जावली-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)