ॐ साईनाथ मित्र मंडळाच्या साई दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान

0

 


ॐ साईनाथ मित्र मंडळाच्या साई दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान



केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -


!! श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज

परब्रम्ह श्री सच्चिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय !!


च्या घोषात मोठ्या उत्साहात ॐ साईनाथ मित्र मंडळ केळघर विभागाच्यावतीने केळघर ते शिर्डी या पायी दिंडीला प्रारंभ झाला . मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र (भाऊ ) धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या १७ वर्षापासून ही साई दिंडी सुरु असून या दिंडीत परिसरासह तालुक्यातील साई भक्त पुरुष , स्रिया मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात .

   येथील साई मंदिरातून सकाळी अकरा वाजता साई दिंडी पालखी सोहळ्याचे प्रस्थान शिर्डीकडे झाले यावेळी पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी सहा वाजता श्रींचा अभिषेक, पादुका पूजन तसेच आरती करण्यात आली यावेळी जावली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. जयश्रीताई गिरी , मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जे जगदाळे, संजय पार्टे , जगन्नाथ पार्टे, रामचंद्र बेलोशे, मनोहर शिर्के, राजेंद्र गाडवे , बजरंग पार्टे,बाजीराव धनावडे, बाळसाहेब शिर्के , राजेश बेलोशे , दिपक मोरे , काशिनाथ बेलोशे , बाजीराव पार्टे , सतीश पार्टे,बापू दळवी, शांताराम बेलोशे यांची प्रमुख उपस्थिती होती. या पालखी सोहळ्याचा मुक्काम कुडाळ, वाठार स्टेशन, गुळुंचे,सुपा, नागरगाव, शिरूर,हंगा, लिंबागव वाघा, राहुरी, कोल्हार येथे होणार आहेत. मार्गावरील गावा गावात मोठ्या भक्तीमय वातावरणात दिंडीचे स्वागत करण्यात येत आहे .१६ फेब्रुवारीला दिंडी शिर्डी येथे पोचणार आहे. असे ओम साई मित्र मंडळ यांच्यावतीने सांगण्यात आले.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)