विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा -नितीन तारळकर

0

 


विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा

-नितीन तारळकर

मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) -विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंचा आदर्श घ्यावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी व्यक्त केले.

    आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आयोजित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर अंतर्गत सातारा जिल्हा विभागीय जलतरण (पुरुष आणि महिला) स्पर्धा सातारा येथे जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडल्या या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी ,उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे ,सातारा विभागीय क्रीडा परिषदेच्या सचिव श्रीमती वैशाली खाडे , जेष्ठ प्रा .डॉ.दीपक डांगे ,प्रा. बाळासाहेब भोसले आदि उपस्थित होते.

सदर स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना नितीन तारळकर यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय साध्य करताना कष्ट, चिकाटी आणि अचूक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

         अध्यक्षस्थानी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा चे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध उदाहरणे देत विध्यार्थी दशेत सुनियोजित सराव व मेहनत करणे अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच या प्रसंगी बोलताना त्यांनी जलतरणपटू अमेरिकन ऑलिंपिक खेळाडू मायकेल फेल्प्स व विरधवल खाडे , यांचे उदाहरण देत त्याप्रमाणे वाटचाल करण्याचे आवाहन केले.

सदर स्पर्धेसाठी पंधरा महाविद्यालयातून सुमारे साठ विध्यार्थी विविध जलतरण प्रकारात सहभागी झाले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे 

कार्यक्रमाचे आभार डॉ संजय भोसले यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रकाश जवळ यांनी केले.सदर कार्यक्रमांस विविध महाविद्यालयातील संघ व्यवस्थापक आणि बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)