श्रमिकचे संस्थापक आदिनाथ ओंबळे यांची 'अफार्म ' च्या सदस्यपदी निवड

0

 


श्रमिकचे संस्थापक आदिनाथ ओंबळे यांची 'अफार्म ' च्या सदस्यपदी निवड
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - केडंबे ( ता . जावली) येथील रहिवाशी आणि श्रमिक जनता विकास संस्था मेढाचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ तुकाराम ओंबळे  यांची ॲक्शन फॉर अग्रीकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र पुणे ( अफार्म ) या राज्य पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारणी सदस्यपदी  नुकतीच निवड करण्यात आली .
    श्री . ओंबळे यांना राज्य पातळीवर सामाजिक काम करणेची संधी मिळाली असून त्यांची  निवड सार्थ झाली त्यामुळे आपल्या कार्याचा अनुभव राज्यातील अनेक संस्थाना होईल असे मत अफार्मचे अध्यक्ष  प्रमोदजी देशमुख यांनी त्यांच्या निवडी वेळी व्यक्त केले.
       आदिनाथ ओंबळे यांनी आपले शिक्षण पुर्ण करून सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवुन तळगाळतील अनेक सामान्य वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने १९९५ पासुन आज अखेर श्रमिक सस्थेच्या माध्यमातून सातारा ठाणे रायगड पुणे या जिल्ह्यात अनेक सामाजीक कामे लोक संस्था निर्मीती करून सातत्याने आपल्या कामाचा आलेख उंचावत ठेवला आहे. कै.विजयराव मोकाशी साहेबांच्या पाणी चळवळीत ५४ गावाच्या शेतीसाठी पाणी या बोंडारवाडी धरण कृती समीतीत सक्रिय राहून
या संधीचे सोने करून निश्चितच आपल्या विभागातील संस्था व समाजाला याचा फायदा करून देईन असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले .


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)