आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय आणि दूधसाखर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल वेबिनार संपन्न.

0

 


आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय  आणि दूधसाखर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल वेबिनार संपन्न.


मेढा : प्रतिनिधी - ( टिमदिव्य दृष्टी नामा न्यूज ) - आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा आणि दूधसाखर महाविद्यालय बिद्री यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल वेबिनार संपन्न.
   आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा व दूध साखर महाविद्यालय बिद्री यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल वेबिनार संपन्न झाले. या वेबिनारची मेन थीम "हाऊ टू क्रॅक नेट सेट एक्झामिनेशन इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स" ही होती.  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी  यांनी आपल्या मनोगतात स्पर्धा परीक्षांमध्ये सेट नेट ही परीक्षा प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक आहे आणि ती पास होण्यासाठी अशा कार्यशालांची आवश्यकता आहे असे सांगितले. सर्व ग्रंथालय प्रोफेशनल जास्तीत जास्त अभ्यास करून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ठेवून परीक्षा दिल्यास नक्की यश मिळेल असे संबोधन केले आणि वेबिनारसाठी शुभेच्छा दिल्या. दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय डी. पाटील  यांनी सर्व ग्रंथालय प्रोफेशनल यांनी या कार्यशाळेचा उपयोग करून अभ्यास केल्यास आपण नेट सेट परीक्षेमध्ये पात्र नक्की होणार असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सर यांनी सर्व ग्रंथालय प्रोफेशनल यांनी हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क करून परीक्षेला समोर जावे असे उदबोधन केले.
       प्रमुख मार्गदर्शक मा. अतुल नगरकर यांनी नेट सेट च्या सिल्याबस नुसार नेमका अभ्यास कसा करावा, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करताना प्रश्नांचे विश्लेषण कसे करावे. त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने करून अचूक उत्तराकडे कसे जायचे हे स्पष्ट केले. या वेबिनार साठी महाराष्ट्रातील तसेच उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, राजस्थान, कर्नाटक व गोवा येथील ग्रंथालय प्रोफेशनल यांनी सहभाग नोंदविला.या वेबिनारचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक व आभार  ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी केले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)