श्री ज्ञानदेव रांजणे साहेब वाढदिवस विशेष
तुमच्या इच्छा आकांक्षाचा
वेलू गगनाला भिडू दे... I
तुमच्या जीवनात सर्व काही
मनासारखे घडू दे.... ! व आपल्या .सारख्या ,
व्यक्तीची साथ सदैव आमच्या सोबत राहू दे..!
आपणांस दिर्घ आयुष्य लाभो ,
हि प्रार्थना.......!
सातारा जिल्हयातील गर्द वनराईने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या , कृष्णा , कोयना , वेण्णा नद्यांचा संगम असलेल्या व आशिलमाल देवाच्या कृपेने पावन झालेल्या आंबेघर या जावली तालुक्यातील गावात ज्ञानदेव किसन रांजने साहेब यांचा जन्म झाला . घरची आर्थिक परिस्थिती नाजूक व जेमतेम असल्यामुळे त्यांनी अनेक वर्षे आपल्या आजोळी आसनी या गावी व्यथित केले .ज्ञानदेव रांजणे साहेब यांनी आपल्या घरच्या हालखीच्या परिस्थितीत आपले शालेय , माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले .आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन सहकार क्षेञात काम करण्यास त्यांनी सुरुवात केली .
सहकार महर्षि भाई वागंडे साहेब यांच्या शिवसहयाद्रि या नामांकित पतसंस्थेत नोकरीस ते रुजू झाले . रांजणे साहेब शिवसध्याद्रीचे प्रामाणिकपणे व जबाबदारीने करत असलेले कार्य पाहून श्री .भाई वागंडे यांच्या गळ्यातील ताईतच बनले . शिवसह्याद्री परिवाराच्या वाढीसाठी व विस्तारासाठी करत असलेले कार्य पाहून रांजणे साहेबांवर मोठी जबाबदारी देण्यात आली . पुढे ओखवडी गावच्या सुकन्या अर्चनाताई यांच्या सोबत विवाह झाला . तसेच सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिकतेचे वेड त्यांच्या नसानसात भिनलेले होते . माझ्या मातीसाठी काहीतरी केले पाहिजे व माझ्या मातीतील माणसांसाठी जर माझा उपयोग होत असेल तर मी स्वतःला भाग्यवान समजेन याच एका महत्वकांशेपोटी त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्यास जोरदार स्वरूपात सुरुवात केली .
तसेच या भागातील लोक हे प्रामुख्याने शेती करुन उदरनिर्वाह करतात . त्यामुळे अशावेळी या कुटुंबावर अनेक वेळा संकटेही कोसळत असतात . अशावेळी त्या कुटुंबाला एक आधार म्हणून ज्ञानदेव रांजणे साहेब नेहमीच देवदुतासारखे धावून येतात . त्यामुळेच रांजणे साहेब यांनी जनमाणसात आपले आगळेवेगळे अढळस्थान निर्माण केले आहे .जावलीतील युवकांना क्रिकेट ,कबड्डी सारख्या खेळाची प्रचंड आवड व या युवकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी रांजणे साहेब भागातील प्रत्येक मंडळाला क्रिकेटसाठी बक्षीसे देत असतात . जेणेकरून जावलीतील नवयुवकाना यातून प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल एवढीच माफक अपेक्षा ठेऊन ते नवयुवकांना सतत प्रेरणा देत असतात . तालुक्याचे लाडके आमदार मा . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्या मनात रांजणे साहेबांनी आपल्या कार्याच्या व कामकाजाच्या जोरावर अढळस्थान निर्माण केले .
जनतेसाठी अहोराञ धावून येणारे रांजणे साहेबांना भागातील जनतेने मतरुपी प्रेम बहाल करुन अiबेघर गावच्या सुकन्येला पाच वर्षापूर्वी थेट जिल्हा परिषदेवर पाठवले .आ छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एवढयावरच न थांबता जावलीकरांच्या उत्तराई म्हणून सौ . अर्चनाताई रांजणे यांना जिल्हा नियोजन समिती सदस्य व बांधकाम समिती सदस्यपदही देऊ केले . यावरूनच बाबाराजे यांचे जावलीकर जनतेवर असणारे प्रेम दिसून येते . राष्ट्रवादी पक्षाबरोबरच तालुक्यातील विविध पक्षातील नेत्यासोबत व कार्यकर्त्यासोबत रांजणे यांचे जिल्हाळ्याचे संबध आहेत . जिल्हा परिषदा निवडणुका झाल्यापासून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ . अर्चनाताई रांजणे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत . जिल्हा , तालुका स्तरावरील रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप , तसेच गोर- गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करत असतात . नुकत्याच झालेत्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मातब्बर प्रतिस्पर्ध्याला चितपट करत बाबाराजेंनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत या निवडणुकीत विजय मिळवून रांजणे यांनी इतिहास घडवून राजकीय धुरीनांना आपली दखल घेण्यास भाग पाडले.
जिल्हा परिषद गटात येणाऱ्या सर्व गावातील समस्यांचा ते वेळोवेळी आढावा घेत असतात . यासाठी ते विभागवार बैठका घेऊन जनतेच्या अडी-अडचणी , समस्या जाणून घेत असतात .एखादे काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत. सामाजिक , विधायक उपक्रमांना ते नेहमी पाठबळ देतात .प्रत्येक गाव हे सुखसोई -सुविधांनी परिपूर्ण असावे हाच त्यांचा या पाठीमागचा मानस असतो . रांजणे साहेबांसोबत आम्हास कार्य करण्यास मिळाले हेच आमचे मोठे भाग्य म्हणावे लागेल . त्यांच्याकडून मिळणारी समाजकार्याची प्रेरणा आम्ही नेहमीच जपण्याचा प्रयत्न करत असतो . कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्याला प्रोत्साहन कसे द्यायचे हे साहेबांकडून शिकलो . व याचा उपयोग समाजासाठी करण्याचा नेहमीच प्रयत्न करु . लवकरच रांजणे साहेबांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळावी . अशा या आमच्या लाडक्या नेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!
शब्दाकंन,
श्री . सागर विजय धनावडे
युवा उद्योजक , आसनी
संकलन - संजय दळवी , केळघर


