नांदगणे - रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ करताना सागर धनावडे , संतोष कासुर्डे , सुनिल जांभळे , सुनिता दळवी , पांडुरंग दळवी , संजय दळवी , विष्णू दळवी व ग्रामस्थ
नांदगणे येथे आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या फंडातील रस्ता काँक्रिटीकरणाचा , ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या वाढदिनी शुभारंभ
केळघर : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि समाजसेवक ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगणे गावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून विकासात्मक कामे केली जात असल्याचे प्रतिपादन युवा उद्योजक सागर धनावडे यांनी केले .
नांदगणे ता . जावली येथे जिल्हा बँकेचे संचालक समाजसेवक ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या फंडातून मंजूर झालेल्या रामा १४० नांदगणे - काळेश्वरी मंदिर ते मरिआई मंदिर या रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचा व सार्वजनिक शौचालय बांधकामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला . यावेळी ते बोलत होते .यावेळी खादी ग्रामोद्योगचे संस्थेचे चेअरमन संतोष कासुर्डे , केळघर विकास सोसायटीचे संचालक सुनिल जांभळे , माजी सरपंच सौ सुनिता दळवी , पांडुरंग दगडू दळवी , संजय दळवी , पोलीस पाटील विष्णू दळवी , माजी उपसरपंच जगनाथ दळवी आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी धनावडे पुढे म्हणाले , नांदगणे गाव विधायक कामात नेहमी पुढे असते . त्यामुळे येथील ग्रामपंचायतीवर प्रशासक असतानाही आ शिवेंद्रसिंहराजे भोसले व समाजसेवक ज्ञानदेव रांजणे यांनी गावच्या विकासात्मक कामांना प्राधान्य दिले असून येथील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या पाणी पुरवठा योजनेचाही लवकरच शुभारंभ करणार असल्याचे सांगितले .
यावेळी नेहरु युवा मंडळाचे अध्यक्ष शांताराम बेलोशे , खजिनदार बापू दळवी , विक्रम सावंत ( गुरुजी ) ,पाडुंरंग कृष्णा दळवी ,नारायण खाडे , नामदेव दळवी , राजाराम दळवी , गणपत दळवी , बाबू दळवी ,सुनिल दळवी , ज्ञानेश्वर दळवी , भिकू पंडीत , विजय खाडे , शिवाजी खाडे , अरुण खाडे , अलका दळवी यांच्यासह ग्रामस्थ , युवक उपस्थित होते .