राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( अजित पवार गट ) सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर, जावली तालुकाध्यक्षपदी साधू चिकणे तर सातारा शहराध्यक्षपदी ॲड बाळासाहेब बाबर यांची निवड

0

 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( अजित पवार गट ) सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर, जावली तालुकाध्यक्षपदी साधू चिकणे तर सातारा शहराध्यक्षपदी ॲड बाळासाहेब बाबर यांची निवड

मेढा : प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( अजितदादा गट ) सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर, जावली तालुकाध्यक्षपदी साधू चिकणे तर सातारा शहराध्यक्षपदी अॅड बाळासाहेब बाबर यांची निवड करण्यात आली .
     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष निवडणुकीच्या अनुषंगाने बळकट करण्याच्या दृष्टीने जिल्हाध्यक्षांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी सातारा विधानसभा मतदारसंघातील सातारा तालुका अध्यक्षपदी शशिकांत वाईकर तर जावळी तालुकाध्यक्षपदी आपले खंदे समर्थक साधू चिकणे यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. तर सातारा शहराध्यक्षपदी ॲड बाळासाहेब बाबर यांची  निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी .चे सर्वेसर्वा अजितदादा पवार व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार जिल्ह्याचे नेते श्रीमंत. रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांच्या नेतृवाखाली सातारा - जावली विधान सभा मतदार संघातील नूतन

पदाधिकारी निवडी संघटन मजबूत करण्याकरिता आज या निवडी करण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुका व विधानसभा निवडण्कीमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता या निवडी करण्यात आले असल्याचे अमित कदम यांनी स्पष्ट करीत नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनांच्या कामास वेळ देऊन ग्रामीण भागात कार्यकर्ते जोडावेत अशा सूचना दिल्या.

पक्षाच्या इतर विभागाच्या प्रमुख निवडी देखील यावेळी करण्यात आल्या. महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी सौ. संगीता देशमुख, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष पदावर शमशुद्दीन सय्यद, कोंडवे तसेच ओ.बी.सी.विभाग शहर अध्यक्ष पदावर श्री .बनकर, सातारा-जावली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र शेलार, कार्याध्यक्षपदी महेश पाटील, सातारा जिल्हा चिटणीसपदी प्रकाश कदम अशा निवडी करण्यात आल्या
          
यावेळी प्रमुख जिल्हा सरचिटणीस श्रीनिवासजी शिंदे, जावली सहकारी बँक संचालक योगेश गोळे, संचालक - प्रकाश कोकरे, अध्यक्ष - शिवाजीराव देशमुख, सौ. वैशाली सुतार, संदीप भोसले व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

'राष्ट्रवादी वरिष्ठ नेत्यांनी जी जबाबदारी दिली आहे, ती प्रामाणिकपणे काम करून जावळी तालुक्यात राष्ट्रवादी स्थापनेवेळी जो पक्षाचा झंझावात होता. तो पुनश्च निर्माण करणार.

साधू चिकणे, नूतन राष्ट्रवादी अध्यक्ष ,
     जावळी तालुका


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)