मेढा येथे श्री ज्ञानदेव रांजणे ( साहेब ) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
केळघर प्रतिनिधी - ( टिम दिव्यदृष्टी नामा न्यूज ) - श्री सागर धनावडे सर मित्र समूह , शौर्य करिअर ॲकॅडमी मेढा व हायटेक कँम्प्युटर मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने मेढा येथे समाजसेवक श्री. ज्ञानदेव रांजणे ( साहेब ) यांच्या वाढदिवसा निमित्त सोमवार दि . १ जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा उद्योजक सागर धनावडे यांनी दिली .
मेढा येथील शौर्य करिअर ॲकॅडमी येथे सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक रक्तदात्यास स्मार्ट वॉच / शूज भेट देण्यात येणार आहेत . तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावेत . असे आवाहन आयोजकांनी केले आहे .