नाचणीचे गाव कुसुंबीच्या , दिवाळी पदार्थांची चव

0

 


मेढा -प्रतिनिधी ( टिम दिव्यदृष्टी नामा )

      अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या नाचणीचे गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री क्षेत्र ‌कुसूंबी येथील नाचणी पासून बनवलेले दिवाळी पदार्थ अमेरिकेत जात आहेत..कुसुंबी हे गाव कास पठाराच्या पायथ्याशी वसलेले आहे.. बारा वाड्या वस्त्या असलेल्या या गावाची ग्रुप ग्रामपंचायत कारभार हाकत असते..या गावाचे प्रमुख पिक नाचणी आहे..डोंगरावर बसाल्ट चा खडक आणि त्यातून वाहून येणाऱ्या पाण्यात खनिजांचे पोषक घटक मँग्नेशियम, कँल्सियम,झिंक इत्यादी पिकांना दर्जेदार बनवतात..त्यातच पिक घेण्याची पद्धत पारंपारीक आहे.. गुरे ढोरे ,शेळ्या मेंढ्यांच्या मलमूत्रामुळे जमिनीत मातीचा पोत चांगला आहे..रासायनिक खतांचा वापर टाळला जातो..शेती उतारावर असल्याने पाणी निचरा उत्तम प्रकारे होतो..यामुळे नाचणी पिकाचे उच्च प्रतीने पोषण होते..या गावातील नाचणी पिकाचे सरासरी वार्षिक उत्पादन 85 टन इतके घेतले जात होते..बाजारपेठेत मागणी वाढल्याने नाचणी पिकाच्या लागवडीच्या प्रमाणात यावर्षी दूप्पट वाढ झाली आहे..  

नुकतेच या गावाला "महाराष्ट्र फाउंडेशन" या अमेरिका स्थित संस्थेने दत्तक घेतले आहे..त्या सोबत अवार्ड संस्था सातारा, आर एस सी डी संस्था मुंबई यांचे सहकार्य मिळत आहे.. नागरीकांची विविध पातळीवर सुधारणा होण्यासाठी या ठिकाणी या संस्थांनी *पंचम प्रकल्प* हाती घेतला आहे..यामुळे महिला सक्षमीकरण, आरोग्य सूधारणा,शैक्षणिक सूधारणा, शैक्षणिक संकुलांना अत्यावश्यक गोष्टी पुरवठा, सेंद्रिय पद्धतीने परसबाग लागवड, सोलर एनर्जी स्कुल, बचत गट निर्मिती, नाचणी ऊत्पादनावर प्रक्रिया ऊद्योग, सतत चालू असलेली प्रशिक्षण शिबिरे, प्रक्रिया ऊद्योगामुळे नाचणीच्या पदार्थांची रेसिपी सराव आणि त्याची प्रसिद्धी मिळत आहे.. नाचणी आहारात पोषक म्हणून सध्या बाजारात सुप्रसिद्ध झाली असल्याने नाचणी पदार्थांना प्रचंड मागणी आहे.. याचे महत्त्व ओळखून वरील संस्थांच्या तांत्रिक सहकार्याने मागील वर्षी कुसुंबी हे नाचणीचे गाव घोषित करण्यात आले तसा ग्रामसभेत ठराव करण्यात आला.. शासनदरबारी मंजुरी मिळण्यासाठी कागदोपत्री संपूर्ण माहिती पुरवण्यात आली आहे.. 

महिलांना पदार्थ निर्मितीमध्ये गुजरात, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी प्रशिक्षण देऊन पारंगत करण्यात आले आहे..या गावातील हिरकणी सौ.सगिताताई वेंदे या अवॉर्ड संस्थेच्या संचालिका असल्याने महिलांना एकत्रित करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे त्यांनी काम केले.. यामुळे महिलांनी घोडदौड सुरू झाली आहे..महिला फुड प्रोसेसिंग कंपनी स्थापन करण्यात आली आहे..

नाचणीचे पौष्टिक लाड, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक, ईत्यादी मोठ्या प्रमाणात मागणी प्रमाणे बनवून दिले जात आहे..दर्जेदार उत्पादन असल्याने याची अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत गेली.. नुकतीच या कंपनीला शुद्ध नाचणीपासुन बनविलेल्या दिवाळी पदार्थांची मोठी ऑर्डर अमेरीका स्थित महाराष्ट्रीयन लोकांनी दिली आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर महिलांनी रात्रंदिवस काम करून या उत्पादक महिलांनी पहिला टप्पा पुर्ण करुन पाठवून दिला आहे..यामुळे सर्व स्तरांतून नाचणीचे गाव कुसुंबीच्या महिलांचे कौतुक होत आहे..

*कुसुंबी गावाला विविध स्तरांवर प्रसिद्धी मिळवून देणे, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे,गावाला पर्यटनात नावलौकिक मिळवून देणे, काळेश्वरी देवस्थानाला 'ब' वर्ग दर्जा मिळवून देणे, तसेच मुंबईकडे जाणार्या तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे अशी धोरणे हाती घेतली आहेत..*

- मारुती चिकणे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबी..

         गावाच्या कायापालट प्रकल्पात सर्व ग्रामस्थांचे ,देवस्थान ट्रस्ट, विविध मंडळे, वाड्या वस्त्यातील होतकरू तरुण यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे..तसेच या जडणघडणीत उपसरपंच श्री निवृत्ती मोरे, ग्रामपंचायत कुसूंबीचे सर्व सदस्य,पोलिस पाटील श्री‌.एकनाथ सुतार, काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रामदास वेंदे, उपाध्यक्ष श्री.विजय वेंदे, सचिव श्री.किसनराव चिकणे,सर्व विश्वस्त, नेहरू युवा मंडळ ‌कुसूंबीचे अध्यक्ष श्रीकृष्ण चिकणे, उपाध्यक्ष श्री.अजय कुंभार, सचिव श्री.जितीन वेंदे यांचेही विशेष योगदान मिळत आहे..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)